लहीत खु येथील आदर्श विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न..

कोतुळ प्रतिनिधी
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित…आदर्श माध्यमिक विद्यालय लहित खुर्द तालुका अकोले..या विद्यालयात
पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला
संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अकोले तालुक्याचे आमदार. डॉ किरण लहामटे हे उपस्थित होते.
संस्थेचे पदाधिकारी श्री मिलिंद पांडे संस्था खजिनदार, विश्वस्त श्री भूषण कानवडे, संस्था लेखापरीक्षक श्री अशोक गवारी , संस्था शिक्षणाधिकारी श्री डी. बी. फापाळे तसेच लहित गावचे व वाघापूर गावचे सरपंच उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ व पालक वर्ग, लहित खुर्द व वाघापूर.. यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक. श्री. सुनील सूर्यवंशी यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे शिक्षक श्री कवडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार लहामटे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जी जोशी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी यांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते संपन्न झाला.आमदार किरण लहामटे यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

विद्यालयाचा अहवाल वाचनाचे काम विद्यालयाचे शिक्षक श्री दातखिळे यांनी केल
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागाच्या वतीने व क्रीडा विभागाच्या वतीने दिले जाणारे प्रमाणपत्र उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बिडवे बी एस यांनी केले. आणि या कार्यक्रमाची सांगता भैरवी या रागाने लहित गावचे वाद्यवृंद यांनी केली शिक्षक श्री कवडे यांनीं आभार मानले
विद्यालयाचे शिक्षक श्री देशमुख सर. श्रीमती ज्योती देशमुख मॅडम तळपे मॅडम श्रीमती कानवडे मॅडम उघडे मामा या सर्वांचे कार्यक्रमास सहकार्य मिळाले