कृषी

पिंपळगाव,शेरणखेल येथील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राधाकृष्ण विखेंच्या भेटीला.


निळवंडे लाभक्षेत्रातील पाणीपट्टी कमी करण्याची केली मागणी.


अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील डोंगराळ तसेच खडकाळ भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या पिंपळगाव नाकविंदा तसेच शेरणखेल येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.

निळवंडे लाभक्षेत्रातील वाढवलेली पाणीपट्टी पुर्वीप्रमाणेच कमी करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.परंतु अवेळी पडणारा पाऊस,अतिवृष्टी,दुष्काळ,पाण्याची कमतरता,हवामानातील बदल,शेतीमालाला हमीभाव नसणे,खते,बियाणे,औषधे यांचे वाढते दर,निर्यात बंदी,सरकारी धोरण यांमुळे अर्थव्यवस्थेचा कणा नेहमीच ताट रहाण्याऐवजी मोडलेला पाहायला मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.त्यातच वाढत जाणारी पाणीपट्टीची समस्या सतत भेडसावत आहे.

.अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा व शेरणखेल येथील निळवंडे धरण लाभक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच भाऊसाहेब कासार,वाळीबा नाना लगड,पोलीस पाटील चंद्रकांत लगड,संदिप आभाळे, नवनाथ लगड,संतोष लगड, भिमराव सदगिर, खंडू लगड आदी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाणीपट्टी पुर्वीच्या दराने व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची लोणी येथे भेट घेऊन चर्चा केली.तसेच निवेदन दिले.आधिच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे.निळवंडे जलाशयातील पाणीपट्टी आहे त्या पाणीपट्टीच्या विस पटीने वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठा आन्याय झाला आहे.हा झालेला अन्याय दुर करून त्यात लक्ष घालून न्याय दयावा. योग्य ती पाणी पट्टी करण्यात यावी पुर्वीची असलेली पाणीपट्टी भरण्यास सर्व शेतकरी तयार असून सध्याची विस पटीने वाढलेली पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाही.तरी आपण सदर निवेदनाचा विचार करून शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीची पाणीपट्टी मिळावी.संबंधीत विभागास योग्य ती कार्यवाही करण्यास आदेश दयावेत अशी विनंती केली आहे.तसेच सदर मागणीचे निवेदन दिले आहे. सदर निवेदना बरोबरच पाणीपट्टी धारकांची यादी जोडण्यात आली आहे.सदर मागणीला लवकरच योग्य तो न्याय मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button