पिंपळगाव खांड चे रोटेशन सुटणार ! पाणी सोडण्याची घाई करू नये -देशमुख

कोतुळ प्रतिनिधी
पिंपळगाव खांड लघु प्रकल्पातून शेतीच्या पाण्याचे रोटेशन सोडण्याचा निर्णय आमदार डॉक्टर किरण ल हा मटे यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून पाणी रोटेशन सोडण्यावरून पुन्हा संघर्ष उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे
पिंपळगाव खांड प्रकल्पातून पाणी रोटेशन सोडण्याची घाई करू नये अन्यथा भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांना गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे कोतूळ येथील भाजपाचे कार्यकर्ते राजेंद्र पाटील देशमुख ,सचिन गीते यांनी म्हटले आहे
पिंपळगाव खांड लघु प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक कोतुळ येथे शुक्रवारी आमदार डॉक्टर किरण लहांमटे यांच्या उपस्थित पार पडली
यावेळी या बैठकीत पिंपळगाव खांड प्रकल्पातून 320 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्याचे ठरवण्यात आले दिनांक १ फेब्रुवारी पासून हे रोटेशन सुरू करण्यात येणार आहे परंतु एकाच रोटेशन मध्ये 324 दशलक्ष घनफूट पाणी खर्च केल्यास शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामना करावा लागेल शेतकऱ्यांचे पीक करपतील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पिके वाया जातील अशी भीती श्री राजेंद्र पाटील देशमुख, सचिन गीते यांनी व्यक्त केली आहे मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये 157दलगफू पाण्याचे पहिले रोटेशन सोडण्यात आले मग यावर्षी पहिल्याच वेळेस 324 दलघ फु पाणी का सोडायचे। निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात येणारा निर्णय चुकीचा ठरू शकतो या निर्णयाचा गंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागेल पाणी सोडायचे असेल तर किमान 15 फेब्रुवारी नंतर रोटेशन सुरू करावे ते देखील किमान 200दल घ फु पेक्षा अधिक पाणी सोडू नये तरच उन्हाळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन होईल अन्यथा गंभीर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला असे श्री राजू पाटील देशमुख ,श्री सचिन गिते यांनी म्हटले आहे
मुळेचा पाणीप्रश्न न्यायालयात जाणार!
अकोला संगमनेर तालुक्यातील मुळा नदीवरील हक्काच्या पाण्यासाठी लवकरच न्यायालयात जाणार असल्याची माहिती सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर फापाळे यांनी सांगितले याबाबत श्री फापाळे म्हणाले की पिंपळगाव खांड हा प्रकल्प मुळा विभागासाठी अत्यंत तुटपुंजा आहे यातून पाण्याचे नियोजन समाधानकारक होणार नाही संगमनेर- अकोले तालुक्याला मुळा नदीतील पाण्याचा वाटा राखीव झाला पाहिजे यासाठी न्यायालयाचे दार ठोटावने हा एकमेव पर्याय आहे त्या दृष्टीने आम्ही तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले
संगमनेर अकोले तालुक्यात सर्व बंधारे यांचा विचार करता एक टीएमसी पाणीदेखील मुळा नदीवर अडवले गेले नाही मात्र याच पाण्यावर राहुरी तालुक्यात 26 टीएमसी चे धरण दरवर्षी भरते हा विरोधाभास आहे यासाठी संगमनेर अकोल्याचा पाण्याचा हक्क राखीव ठेवण्यासाठी न्यायालयात जाणे हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले