पळवे बुद्रुक येथील दर्शन पळसकर जिल्ह्यात तिसरा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :-
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन आयोजित जगातील सर्वात मोठी मूल्यशिक्षण श्रीमद् भगवदगीतेवर आधारित संवर्धन प्रतियोगिता 2023 -24 मध्ये श्री संत निळोबाराय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कुमार दर्शन मोहन पळसकर गाव पळवे बुद्रुक यांनी सहभाग घेतला होता.त्याने दिनांक 15 रोजी प्रथम फेरीत 9500 विद्यार्थ्यांमध्ये 90% प्लस) मध्ये ऑनर्स ग्रेड मिळून पहिल्या 50 मध्ये त्याची निवड झाली व दिनांक 24 रोजी दुपारी 3.30 वाजता झालेल्या ऑनलाइन मुलाखतीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला.

अशाप्रकारे जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला. इस्कॉन तर्फे बक्षीस म्हणून सायकल व प्रशस्तीपत्र माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.यावेळी इस्कॉनचे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रवीण घाटे सर उपस्थित होते या कामी त्याला शाळेचे प्राचार्य श्री घाणे सर व शिक्षक वृंद तसेच आई-वडिलांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.