इतर

दूधाला 40 रुपये भाव मिळावा मागणीसाठी 12 व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच!


शुक्रवारी शरद पवार अकोल्यात
शरद पवारांच्या भूमिके कडे लक्ष!

दूध उत्पादकांच्या मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडे पाठपुरावा करू-

वैभवराव पिचड

अकोले प्रतिनिधी

दुधाला किमान ४०/- रुपये भाव द्या व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा ! या प्रमुख मागणींसाठी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती,च्या वतीने दिनांक ६ जुलै २०२४ पासून सुरु असलेले कोतुळ ता अकोले येथील बेमुदत धरणे आंदोलन आज 12 व्या दिवसी ही सुरूच आहे

आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने आंदोलनाचा राज्यव्यापी लढा सुरू करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे 19 तारखेला( शुक्रवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार अकोल्यात शेतकरीं मेळावा स्व अशोकराव भांगरे यांच्या स्मृतिदिनाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असल्याने शेतकऱ्यांच्या या लढ्याविषयी शरद पवार काय भूमिका घेतात याकडे आता दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे

दुधाचे भाव वर्षभर सातत्याने कोसळत असल्याने राज्यभरातील दुध उत्पादक शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्च पाहता दुधाला किमान ४०/- रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सरकार मात्र अनुदानाचे नाटक करून वेळ मारून नेत आहे. मागील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रति लिटर ५/- रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र अनुदानासाठी इतक्या अटी शर्ती लावल्या की राज्यभरातील २० टक्के शेतकऱ्यांना सुद्धा अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.

देशभरात साडे तीन लाख टन दुध पावडर पडून आहे. शेतकरी दुध भावासाठी आंदोलन करून देशातील दुध पावडर निर्यात करण्याची मागणी करत आहेत. केंद्रातील सरकार मात्र उलट मोठ्या प्रमाणात दुध पावडर आयातीला परवानगी देत आहे.

दुधा बरोबरच आयात निर्यातीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, तेल बिया, डाळी, टमॅटो यासारख्या सर्वच शेतीमालाचे भाव सरकारने पाडले आहेत. शेतकरी या पार्श्वभूमीवर सुरू असलेलेब हे आंदोलन व्यापक करण्याचा इशारा दूध उत्पादक संघर्ष समितीने दिला आहे

  • माजी आमदार वैभवराव पिचड यांनी या आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शविला केंद्र व राज्य शासनाकडे आपण आंदोलकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करूअसे सांगत दूध भेसळ प्रतिबंधक कायदा कठोर करणे तसेच पशुखाद्यांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आंदोलकांच्या पाठीशी आपण असून आंदोलकांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
  • —////—–

या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे

१. ३.५/८.५ गुणवत्तेच्या दुधाला किमान ४०/- रुपये भाव द्या.

२. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तत्काळ विना अटी शर्ती लावता माफ करा.

३. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा

.४. राज्यात दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करा.५. पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करा. पशुखाद्य व पशु औषधांवरील जी.एस.टी. रद्द करा.६. खाजगी व सहकारी दुध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करा.७. कठोर पावले टाकून सर्व प्रकारची दुध भेसळ बंद करा.८. अनिष्ट ब्रॅडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रॅड धोरणाचा स्वीकार करा.९. मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करा.१०. शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करा.११. दुध पावडर आयात बंद करा. दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहन द्या.१२. एस.एन.एफ. कटिंग व एस.एन.एफ. वाढीचा दर समान ठेवा.१३. सरकारी निधीतून मोफत पशु जीवन विमा व पशु आरोग्य विमा योजना राबवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button