आषाढा चा सांगतेला अकोले तालुक्यात जोरदार पाऊस मुळा -प्रवरा आढळा दुधडी!

भंडारदरा -आढळा धरण भरले ,
निळवंडे धरणातून 30 हजाराचा विसर्ग
मुळा धरण 75 टक्के भरले
अकोले प्रतिनिधी
सह्याद्रीच्या घाट माथ्यावर अकोले तालुक्यात पश्चिम पट्ट्यात संतत धार सुरू आहे आषाढ महिन्याचे अखेरच्या टप्प्यात काल पासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अकोले तालुक्यात उगम पावणाऱ्या मुळा आणि प्रवरा या दोन्हींनद्यांना मोठा पूर आला आहे यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे यामुळे भंडारदराधरण भरले आहे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून सदर पाणी निळवंडे धरणात येत आहे निळवंडेतून देखील पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात सोडण्यात आला आहे
भंडारदरा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने रंधा धबधबा येथील पर्यटन क्षेत्राने रौद्र रूप धारण केले आहे येथील धबधबे प्रचंड वेगाने वाहत आहे पाण्याचा विस्तीर्ण वेग पाहता पोलीस प्रशासनाने देखील पर्यटकांच्या
सुरक्षेच्यासाठी उपाययोजना केल्या आहे
अकोल्यात प्रवरा नदी च्या पुरा मुले अकोल्यातील सेतू पूल पाण्याखाली गेला आहे
भंडारदरा धरणातून 25 हजार 394 क्यूसेस चा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे तर निळवंडे धरणातून 30 हजार 775 कुसेस चा विसर्ग प्रवारापात्रात सुरू आहे अकोले तालुक्याच्या उत्तर विभागात आढळा नदी पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने आढळा धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणातून ४०७० क्यूसेस चा विसर्ग सुरू आहे
अतिवृष्टीने भंडारदरा परिसरातील आदिवासी चे जनजीवन गाठून दिले आहे अनेक शेती बांध बंधीस्तीची नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे
पर्यटन पंढरी असणाऱ्या भंडारदरा परिसरात निसर्ग सौंदर्य फुलल्याने पावसात आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली आहे

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड आंबित कुमशेत पाचनई कोथळा , खडकी वाघ दरी घोटी ,पैठण, कोतुळ या भागात जोरदार पाऊस सुरू आहे पावसाच्या या जोरदार बॅटिंग मुळे मुळा नदीला आज विक्रमी पूर आला पुरा मुळे मुळा नदीवरील भागांतील छोटे मोठे पूल पाण्याखाली गेल्याने काहीं। काळ मुळा परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती या वर्षांतील मुळा नदीची ही विक्रमी आवक आणि नदीचे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकां नी मोठी गर्दी केलीं होती
साठा सकाळीं 18 हजार 502 दशलक्ष घनफुट होता सकाळी 9 वाजता तो 18 हजार 683 दशलक्ष घनफुट झाला दुपारी 12 वाजता 18,776 दलघफू झाला दुपारी 3 वाजता 19,149 दल घ फु झाला तर सायंकाळी 6 वाजता 19 हजार 435 दलघ फु साठा झाला
धरणाकडे कोतुळ येथुन जोरदार आवक सुरू आहे आषाढ महिन्याचे सांगतेला मुळा पाणलोट मध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने दोन दिवसांपासून मुळा नदी तुन मुळा धरणाकडे विक्रमी आवक सुरू आहे आज यावर्षीची विक्रमी आवक झाली 41हजार 600 क्यूसेस इतका विक्रमी पूर मुळा नदीला पाहायला मिळाला या वर्षातील हा विक्रमी पूर पाहण्यासाठी नागरि कांनी मोठी गर्दी केली होती या पुरामुळे कोतुळ येथे मुळा नदी काठी असणारे कोतुळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने मंदिरात तील भगवान शंकराची पिंड आणि नंदी पूर्णपणे पाण्या खाली गेले मंदीराचे सभामंडपात व परिसरात चार ते पाच फुटा पेक्षा अधिक पुराचे पाणी पसरले होते मंदिर परिसर पुराचे पाण्याने जलमय झाला होता
मुळा नदीच्या पुरामुळे लहित ते लिंगदेव मार्गावरील पूल पाण्याखालीं गेला या मार्गावरील वाहतूक बराच काळ बंद झाली होती संगमनेर तालुक्यातील साकुर मांडवे पुलावर ही पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती
मुळा नदीतून आज सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासात मुळा धरणात 933 दल घ फूट नवीन पाण्याची आवक झाली मुळा धरण सायंकाळी74.75 टक्के भरले आहे
जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही. डी. पाटील, शाखा
अभियंता आर . जे. पारखे यांच्या देखरेखी खाली
धरणाचे पूरनियंत्रण पातळी चे कर्मचारी धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देत आहे