स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन पंढरी भंडारदऱ्याला एकरी वाहतूक

अकोले / प्रतिनिधी
.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमी वर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पर्यटन पंढरी असणाऱ्या भं डार दरा परिसरात पोलिस प्रशासनाने एकेरी वाहतुक केली आहे
भंडारदर्याला पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनी एकेरी वाहतुकीच्या मार्गाचा अवलंब करावा असे आव्हान राजुर पोलिसांनी केले आहे .
अकोले तालुक्यातील भंडारदरा या पर्यटन स्थळ ला दरवर्षीब हजारो पर्यटक पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात विशेषतः 15 ऑगस्ट या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणणे प्रशासनाला मोठे जिकरीचे असते
पर्यटन पंढरी मध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण , कळसुबाई शिखर , आशिया खंडातील सर्वात खोलदरी सांदणदरी , रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर , रंधा धबधबा , वसुंधरा फॉल , नान्ही फॉल , बाहुबली धबधबा , नेकलेस फॉल , घाटघर येथील कोकणकडा असे प्रेक्षणीय स्थळे आहेत .
या प्रेक्षणीय ठिकाणांना पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात . या दरम्यान वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत असते .
भंडारदरा धरण भरलेले आहे परिसरातील निसर्ग सौंदर्य खुल लेले आहे यामुळे दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यदिनी भंडारदर्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून . पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला यांनी एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला असून तसे आदेश राजूर पोलिसांना देण्यात आले आहेत .
असा आहे वाहतुकीचा मार्ग
रंधा धबधबा येथुन भंडारदरा धरणाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असुन भंडारदर्याला वाकी फाटा /वारंगघुशी फाटा , चिचोंडी फाटा , हॉटेल यश , शेंडी , भंडारदरा धरण असा मार्ग राजुर भागातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी राहणार असून नासिक मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंघुशी फाटा , चिचोंडी , हॉटेल यश , शेंडी, भंडारदरा धरण असा असणारा असून रंधा धबधबा मार्गे पर्यटकांना बाहेर पडता येणार आहे . एकेरी वाहतुकीचा मार्ग हा फक्त स्वातंत्र्य दिनी अवलंबण्यात येणार असल्याची माहिती राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी दिली आहे . पर्यटकांनी सदर दिलेल्या मार्गावरूनच भंडारदरा पर्यटनाचा आनंद लुटावा असे आवाहन राजुर पोलिसांनी केले आहे. राजुर पोलिसांकडून स्वातंत्र्यदिनी एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला आहे
तर पर्यटन सुरळीत होईल - दिलीपराव भांगरे
अहमदनगरचे तात्कालीन पोलीस अधीक्षक श्री कृष्णप्रकाश साहेब यांच्या कालखंडामध्ये भंडारदर्याला प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये एक दंगल पथक नेमले जात होते . त्यावेळी पर्यटकांना पर्यटन करताना कोणतीही अडचण भासत नव्हती . अगदी त्याच प्रकारे जर पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यात आली तर भंडादऱ्याचे पर्यटन अगदी सुरळीत होण्यास मदत होणार होईल असे शेंडीचे माजी सरपंच दिलीपराव भांगरे यांनी सांगितले