अळकुटीच्या सरपंच डॉ.कोमल भंडारी यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

दत्ता ठुबे
पारनेर – अळकुटीच्या अभ्यासू सरपंच डॉ . कोमल संदीप भंडारी यांना पुणे येथील वृत्तसेवा समुहाच्या स्वराज्य रक्षक न्यूज च्या परिवाराच्या स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२४ सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेवून सरपंच डॉ.कोमल भंडारी अळकुटी गावचा विकास करण्यासाठी प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या साह्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून पारनेर तालुक्या बरोबरच नगर जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे.त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात जो एखाद्या कर्मयोग्या प्रमाणे ठसा उठावला आहे, याचा अळकुटी व परिसराला सार्थ अभिमान आहे, त्यांचे कार्य प्रशासकीय पातळीवर सन्मान योग्य तर आहेच, पण येणाऱ्या नव्या पिढीसाठी सामाजिक कार्यासाठी उत्तम मार्गदर्शक म्हणून ऊर्जा स्रोत असून आदर्श उभा करू शकतो.राष्ट्र निर्मितीच्या कार्यातील त्यांच्या प्रामाणिक सेवा वृत्ताला मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा या विचाराने प्रेरीत होवून पुणे येथील वृत्तसेवा समूहाच्या स्वराज्य रक्षक न्यूज परिवाराच्या स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला.
स्वराज्य सरपंच सेवा संघाचे राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे स्वराज्य रक्षक न्यूजचे संपादक प्राध्यापक सोमनाथ नाडे,संघाचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या निवड समितीने या राज्यस्तरीय पुरस्कारा साठी सरपंच डॉ.कोमल भंडारी यांचे अळकुटी गावाप्रती असलेले कार्य पाहून त्यांची निवड केली आहे.
यावेळी राज्यातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील,विभागीय अध्यक्ष अशोक ओव्हाळ,सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे व इतर मान्यवर उपस्थित होते.आदर्श सरपंच डॉ कोमल भंडारी यांच्या निवडी चे पारनेर तालुक्यात कौतूक होत आहे.