इतर

आर आर माने यांना संत सेवा पुरस्कार प्रदान


शेवगाव तालुका प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार रामकिसन माने यांना चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सिताराम घनदाट सामाजिक प्रतिष्ठान यांच्यावतीने दिला जाणारा संत गौरव पुरस्कार नुकताच अहमदनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

२४ वर्षापेक्षाही अधिक काळ ग्रामीण भागात पत्रकारिता करून सामाजिक प्रश्न धसास लावण्याचे काम माने यांनी केले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात सायकलवर फिरवून बातम्यांचे संकलन करून त्याद्वारे शेतकरी शेतमजूर विद्यार्थी रस्ते पाणी वीज यासारख्या अधिक प्रश्न मांडून न्याय देण्याचे काम माने यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठानने संत सेवा राज्यस्तरीय या पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतचा ही गौरव करण्यात आला.

यावेळी नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभैया जगताप, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, चर्मकार परिषदेचे मार्गदर्शक लक्ष्मणराव घुमरे, जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, वसंतराव धाडवे नगरसेवक सागर बोरुडे, प्रकाश भागानगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.माने यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भातकुडगाव फाटा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button