पारनेर मध्ये वृद्धांना व लाडक्या बहिणींना घरपोच मानधन

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
सरकार जनह तासाठी सामाजिक अनेक उपक्रम व योजना राबवीत असतात मात्र त्या योजनांची अंमलबजावणी करत असताना त्यात अनेक त्रुटी असतात अशीच एक त्रुटी एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ओळखली.वयोवृद्ध माता-पित्यांना व लडकी बहीण यांना घरी जाऊन योजनेचे पैसे घरपोच मोफत देत आहेत.
पारनेर शहरासह तालुक्यात अनेक सहकारी तयार करू.भाऊसाहेब खेडेकर सरकार देत असलेल्या संजय गांधी निराधार व लाडकी बहीण योजनेचे मानधन ते स्वखर्चाने वृद्ध माता-पित्यांना व लाडक्या बहिणींना कोणताही मोबदला न घेता थेट घरपोच करीत आहे.
सरकारने वयोवृद्ध व लडकी बहीण यांना दरमहा 1500 रुपये पेन्शन सुरू केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेत 60 पेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांचा समावेश केला जातो.हे पैसे संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावरच जमा होतात.ही रक्कम अनेकदा कधीही जमा होते.
त्यात फारसे सातत्य राहत नाही त्यामुळे या वृद्धांना पैसे कधी जमा होतात हे समजत नाही शिवाय गावातून बँकेचे अंतर बऱ्याचदा खूप असते अशावेळी या वृद्धांना थेट 1500 रुपये काढण्यासाठी बँकेत जाणे कठीण होते,ही अडचण लक्षात आल्याने वृद्धांना पैसे घरपोच कसे घेता येतील यासाठी भाऊसाहेब खेडकर अनेक दिवसापासून विचार करत होते त्यावर त्यांनी तोडगाही काढला .अनेक दिवसापासून त्यांनी पैसे घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता तालुक्यात वृद्धांना व लाडक्या बहिणींना घरपोच पैसे मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे.