नाभिक समाजाच्या आंदोलनाचे वादळ ३० तारखेला आझाद मैदानावर
विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे श्री संत सेनाजी महाराज केसशिल्पी बोर्ड स्वतंत्रपणे तत्काळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनात जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाभिक समाजाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे जिल्हाध्यक्ष मनोज वाघ सलून असोसिएशन जिल्हाध्यक्ष किरण बिडवे तसेच जिल्हा प्रवक्ते किरण मदने यांनी केले.
सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नाभिक समाजासाठी श्री संत सेनाजी महाराज केसशिल्पी बोर्ड तत्काळ स्वतंत्रपणे कार्यान्वित करावे आणि त्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष तथा इतर संचालक मंडळाची नियुक्ती करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनात जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील नाभिक बांधवांनी आपल्या जवळील नातेवाईक व नाभिक समाजातील मित्र परिवाराला घेऊन जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तालुका नाभिक एकता महासंघ तालुकाध्यक्ष किशोर बिडवे सर बाळकृष्ण वाघ संजय जाधव व्याख्याते ओंकार बिडवे नामदेव बिडवे नामदेव नायकोडी गणेश बिडवे उत्तम तापकेरे रविंद्र भराडे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. व संगमनेर तालुक्यातील ज्या कुणाला आंदोलनाला यायचं असेल त्यांनी किरण मदने ( ९५६१२२३२७४ ) यांच्याशी संपर्क साधावा.