अगस्ति विद्यालयाचा पार्थ हासे ची राज्य स्पर्धेसाठी निवड

अकोले प्रतिनिधी
अकोले येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे अगस्ति विद्यालयाचा इयत्ता नववी चा विद्यार्थी पार्थ जनार्दन हासे याची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आयोजित नेटबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत कमालीची चुरस दिसून आली तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. अगस्ति विद्यालयाचा पार्थ हासे यानें आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत उपस्थित सर्वांच्या कौतुकाचे मानकरी होत राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत आपली निवड सार्थ ठरविली.अगदी लहानपणापासून च विविध खेळांत आवड असल्याने आपले लक्ष नेटबॉल कडे केंद्रित केले.
सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा येथील अध्यापक तथा अगस्ति शिक्षक शिक्षकेत्तर सेवक पतसंस्थेचे चेअरमन प्रा जनार्दन हासे यांचे ते पुत्र. यापूर्वी ही पार्थ ने विविध खेळांत आपली गुणवत्ता सिद्ध केली असल्याने या विद्यालयाने सातत्याने खेळातील आपली गुणवत्तेची परंपरा जपली आहे असून ग्रामीण भागातील खेळाडू आपल्या मेहनतीने, चिकाटीने व जिद्दीने पुढे जात असल्याचे गौरवोद्गार श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर यांनी काढले.संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवर्य बा ह नाईकवाडी यांनी संस्थेच्या स्थापनेपासून क्रीडा स्पर्धांना उत्तेजन देत राष्ट्रीय खेळाडू या संस्थेतून तयार व्हावेत यासाठी प्रयत्न केले असल्याने आज तोच आदर्श आपण सर्व जपत येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करून सशक्त करण्याचे आवाहन अध्यक्षा पोखरकर यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पार्थ हासे याच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी , संदीप नाईकवाडी , प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपप्राचार्य भाऊसाहेब घेलवडे , पर्यवेक्षक संजय शिंदे , मंगेश खांबेकर,मार्गदर्शक शिक्षक सौरव पोखरकर , शिक्षक-पालक संघ तसेच सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.