माका येथे उन्हाळी सोयाबीन शेतीशाळा व बिजोत्पादन कार्यक्रम सम्पन्न

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
. तालुका कृषी अधिकारी नेवासा यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रात माका येथे उन्हाळी सोयाबीन शेतीशाळा व बिजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेळी कार्यक्रमास प्रमुख मा्गदर्शक-डॉ. श्याम सुंदर कौशिक प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने , यांनी उन्हाळी सोयाबीन पिकाबद्दल बोलत असताना फुले संगम या वाणाबद्दल माहिती दिली तसेच , पिक संरक्षण ,खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, काढणी पश्चात घ्यावयाची काळजी बद्दल सखोल मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे स्वागत ज्ञानदेव सानप सदस्य,ग्रा प माका यांनी केले , सूत्रसंचालक श्री आर पी पवार ,कृषी सहाय्यक माका यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सानप भाऊसाहेब ग्रामसेवक महालक्ष्मी हिवरे यांनी केले श्री. आर. एस. ठोकने,कृषी पर्यवक्षक, घोडगाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनेबद्दल माहिती दिली तसेच उपस्थित कर्मचारी आर. पी.राठोड कृषी सहाय्यक घोडेगाव , आर.एस.बावस्कर कृषी सहाय्यक मोरगगव्हण, गणेश भऱ्हाट कृषी सहाय्यक चांदा , गोरख काळे कृषी सहाय्यक देडगाव व कृषी मित्र सुभाष गाडे यांनी चहा,पाणी,अल्पोआहार दिले तसेच मोठ्या प्रमाणात माका व महालक्ष्मी हिवरे चे शेतकरी वर्ग उपस्थित होते
