सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील सर्व सरपंचांचे काम बंद आंदोलन!

अकोले प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची अपहरण करून निघृनपने हत्या करण्यात आली आहे . ही घटना मानवतेला कळींबा फासणारी आहे . सरपंच हा गावचा कारभारी असतो . गावाच्या सुखात दुःखात तो नेहमीच धावत असतो . जर सरपंच सुरक्षित नाही तर गाव कसे सुरक्षित राहणार ? . सरपंच संतोष देशमुख यांचे बाबद झालेल्या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र देखील हादरला आहे . सरपंच देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा खुणा देखील सोशल मीडियावर पहिल्या आहे . त्यांचा अतिशय निर्दय पणे खून करण्यात आला आहे . संपूर्ण समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे .
म्हणूनच झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने 1 जानेवारी रोजी अकोले बंद ची हाक देण्यात आली आहे . या बंद मध्ये अकोले तालुक्यातील सर्व सरपंचांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे . 1 जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायती बंद ठेवून काम बंद आंदोलन करणार आहेत .त्या दृष्टीने आज अकोले तालुक्यातील सरपंचांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांचे मार्फत निवेदन दिले आहे .
या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना त्वरित जेरबंद करून फाशी झाली पाहिजे . देशमुख यांचे कुटुंबाला किमान 25 लाखांची मदत झाली पाहिजे. राज्यातील सर्व सरपंचांना संरक्षण मिळाले पाहिजे आदी मागण्या कळस बु येथील सरपंच राजेंद्र गवांदे , सुगाव येथील सरपंच अनुप्रीता शिंदे, गर्दनी येथील सरपंच साधना अभंग, रुंभोडी गावचे सरपंच रविंद्र मालुंजकर, व अकोले तालुक्यातील तमाम सरपंचांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.