आजचे पंचांग व राशिभविष्य दि०१/०१/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ११ शके १९४६
दिनांक :- ०१/०१/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति २६:२५,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २३:४६,
योग :- व्याघात समाप्ति १७:०६,
करण :- बालव समाप्ति १४:५६,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पू. षा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३३ ते ०१:५५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:०३ ते ०७:२५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:२५ ते ०९:४८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:१० ते १२:३३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:४१ ते ०६:०३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इ.स. २०२५ प्रारंभ, चंद्रदर्शन (१९:४१ प.), मु. ४५ समर्घ, दग्ध २६:२५ नं.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ११ शके १९४६
दिनांक = ०१/०१/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.
वृषभ
जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.
मिथुन
आज कामाचा थकवा येईल. परंतु आळस झटकून कामाला लागावे. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.
कर्क
उगाचच रेंगाळत बसून राहू नका. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल.
सिंह
मनात शंकेला थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल.
कन्या
जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.
तूळ
मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक गैरसमज टाळावेत.
वृश्चिक
अति संवेदनशीलता दाखवू नका. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल. नवीन मार्गांचा विचार कराल.
धनू
आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाला बळी पडू नका.
मकर
आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ
कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.
मीन
भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


