खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वाढदिवसाची कोतुळकरांना ११ लाखाची भेट!

अकोले प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी कोतुळकरांना आपल्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक योगदानाची 11 लाखाची भेट दिली
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उद्या 4 जानेवारीला2025 ला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज त्यांनी कोतूळ (तालुका अकोले ) येथील संत सावता महाराज मंदिर चौक सुशोभीकरणासाठी ११ लाखाच्या कामाची प्रशासकीय मंजुरीची भेट दिली.त्यांनी यापूर्वी देखील कोतुळ कोतुळकरांना विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे
संत सावता महाराज मंदिर मंदिरात सप्ताह निमित्ताने त्यांनी काही दिवसांपूर्वीकोतुळ येथे भेट दिली होती त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना शब्द दिला होता तो शब्द त्यांनी आज पूर्ण केला आहे या कामासाठी कोतुळ ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य व भाऊसाहेब वाकचौरे यांचे खंदे समर्थक सागर बाळासाहेब घोलप यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला.अकोले तालुक्यातील जनतेने खासदार वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा निवडणुकीत भरभरून साथ देत मताचे मोठे मताधिक्य दिले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अकोले तालुक्यात विकास कामांच्या रूपाने निश्चितच त्याची परतफेड करतील त्यांच्या रूपाने प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारा एक चांगला लोकप्रतिनिधी मतदारसंघाला मिळाल्याचे श्री सागर घोलप यांनी सांगितले
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जिल्हा नियोजन
समितीच्या माध्यमातून सन २०२४ २०२५ मध्ये नागरी सुविधा अंतर्गत सावता महाराज मंदिर चौक सुशोभीकरण कामासाठी ११ लाख निधींची प्रशासकीय मान्यता मिळाली असून आगामी येत्या काही दिवसांत या कामाचा शुभारंभ केला जाईल असे श्री घोलप यांनी सांगितले . खासदार वाकचौरे यांचे मुळे या कामाला मंजुरी दिल्याने त्यांचे संत सावता महाराज प्रतिष्ठान कोतुळ व खासदार भाऊसाहेब वाकचौरे मित्रमंडळ ,कोतुळ “आपला माणूस आपला मंच” कोतुळ च्या कार्यकर्ते व ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केले आहे