कोतुळ जिल्हा परिषद शाळेत,गुणवंत विद्यार्थीचा सत्कार,

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शालेय पोषण आहार अधीक्षक अरविंद कुमावत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले,
अरविंद कुमावत यांचे वडील कै, श्री चैत्राम बाजीराव कुमावत,(सेवानिवृत्त मुख्याध्यापक,पाथरे ता,सिन्नर जि नाशिक) यांचे स्मृती प्रित्यर्थ ,शाळेतील गुणवंत विद्यार्थी यांचा स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र, देऊन सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमनताई कुमावत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला,या पसंगी मनीषा कुमावत, प्रियंका कुमावत यांनी मनोगत व्यक्त केले,,इयत्ता पहिली ते चौथी मधील तसेच तालुका, जिल्हा स्तरावर विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला,

या प्रसंगी,गणेश घोलप,सरपंच भास्कर लोहकर
ग्राम विकास अधिकारी शरद वावीकर डॉ पंकज कुमावत शाळातील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते,
मुख्याध्यापक दादासाहेब गीते, सिंधू बनोटे मॅडम, अशोक जाधव,सांगडे नंदकुमार पांदे, चौधरी,, प्राथमिक शिक्षक यांनी उत्कृष्ट नियोजन केले सूत्र संचलन नंदकुमार पांदे यांनी केले,तर आभार अशोक जाधव यांनी मानले,