इतर
निमगाव वाघा येथील बाबासाहेब उधार यांचे निधन.

अहिल्यानगर: नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील बाबासाहेब रघुनाथ उधार यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले .ते ४० वर्षाचे होते .
नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले व भानुदास फुले यांचे ते भाचा जावई होते. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असत. . त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ ,तीन बहिणी , असा परिवार आहे . त्यांच्या निधनामुळे गावात दुखवटा म्हणून ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा निमगाव वाघा येथील अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आला. तरुण वयात गेल्याने त्यांच्या अंत्यविधी समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.