इतर

अकोले शहरातील अनधिकृत बांधकामांकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष

अकोले प्रतिनिधी

अकोले नगरपंचायतीचे अकोले शहरातील अनाधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष होत असून अनाधिकृत बांधकामाला नगरपंचायतचा आशीर्वाद असल्याचा असल्याचा आरोप आरपीआयचे युवक तालुकाध्यक्ष विजय पवार यांनी केला आहे

त्यांनी म्हटले आहे की अकोले येथील धामणगांव रोड येथे एक अनाधिकृत बांधकाम करतांना शेजारी असलेल्या घराच्या भिंतीला अक्षरशः भले मोठे भगदाड पडले आहे,व ती भिंत आता पडण्याच्या अवस्थेत आहे,व एवढे होऊन ही हे अनधिकृत बांधकाम करणारे मुजोर कुटुंब हे त्या परिसरात बाहेरून माणसे बोलवून त्या ठिकाणी धटींगशाहीने काम करत आहे,त्यामुळे आजही हे कुटुंब अक्षरशःभयभीत होऊन आपलं घर आपल्या डोळ्यासमोर पडत आहे,ही बघण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे,


त्यांनी अकोले नगरपंचायत येथे 2/3 वेळा तक्रार अर्ज करून देखील या प्रशासनास जाग आली नाही व त्या ठिकाणी अकोले नगरपंचायत चे अधिकारी व साधा कर्मचारी यांनी अद्याप पर्यंत ढुंकूनही पाहिले नाही,उलट या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना हे अकोले नगर पंचायत चे मुख्यअधिकारी पाठीशी घालतांना दिसत आहे,या व्यतिरिक्त या परीवाराने आपल्या घराची भिंत पाडणाऱ्या विरुद्ध व आम्हांला दमदाटी,व धटींगशाही करून मारहाण करू अशी धमकी देणाऱ्या विरुद्ध अकोले पोलिस स्टेशन येथे दोनदा तक्रार अर्ज करून देखील अद्याप पर्यंत या व्यक्तींवर कुठल्या ही प्रकार ची कारवाई झाली नाही,त्या मुळे कायदा नावाचा धाक अकोले तालुक्यात राहिला का नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे,जर अशा प्रकारे एखाद्या कुटुंबावर या पुढे ही अन्याय होत राहिला व या परिवारा ची उद्या भिंत पडून काही जिवीतहानी झाली तर त्याला अकोले नगरपंचायत व अकोले पोलिस स्टेशन जबाबदार राहील याची खबरदारी त्यांनी घ्यावी ,अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने या प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्री पवार यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button