इतर
राजेश तिटमे यांना “ग्रामविकास विभागाचा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार”

अकोले प्रतिनिधी-
तालुक्यातील निंब्रळ गावचे सुपुत्र, पंचायत समिती संगमनेर चे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राजेश तिटमे यांना
यांना “ग्रामविकास विभागाचा सन 2022-2023 चा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार” जाहीर झाला आहे.
श्री .तीटमे हे हुशार, संयमी, सर्वाशी आपुलकीने वागणारे, आणि सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी होणारे अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
ग्रामविकास विभागात काम करताना अधिकाऱ्यांना आपले प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लावून अनेक राज्य व केंद्र पुरस्कृत योजना/प्रकल्प यशस्वी करत असतात.
याच बाबींचा विचार करून राजेश तीटमे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.