इतर
पिंपळगाव माळवीचे भाऊसाहेब गायकवाड यांचे निधन

अहिल्यानगर :प्रतिनिधी–
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील भाऊसाहेब राजाराम गायकवाड यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
ते धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. गोरख गायकवाड व मच्छिंद्र गायकवाड यांचे ते वडील होते . नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले व भानदास फुले यांचे ते मेहुणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक मुलगी , चार भाऊ एक बहीण सुना ,नातवंडे असा परिवार आहे .गावातील अमरधाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता .ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.