अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या वर कायदेशीर कारवाई करा-

.
अकोले (प्रतिनिधी)
अकोले तालुक्यामध्ये वाळू तस्करी, रेशन घोटाळा, दाखले वेळेत न मिळणे शेतकऱ्यांना अनेक कामासाठी चकरा मारायला लागणे, अनेक कामासाठी आर्थिक देवाण-घेवाण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव ग्राहक पंचायतच्या तालुका बैठकीमध्ये घेण्यात आला यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून कारवाईची मागणी करणार असे ठरले.
अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील शिंदे हे होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपचे तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेशराव नवले, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन माधवराव तीटमे, भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, वसंतराव बाळासराफ, बबनराव तिकांडे, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे, साहेबराव दातखिळे, राजेंद्र घायवट बाळासाहेब बनकर राजेंद्र गवांदे शारदा शिंगाडे रामदास पवार, प्रतिभा सूर्यवंशी, दत्ता ताजणे, शारदा शिंगाडे, ज्ञानेश पुंडे, दत्ता शेटे, कैलास तळेकर आदी उपस्थित होते.
अकोले तालुक्यामध्ये गेली दोन महिने स्वतंत्र पाऊस सुरू असल्यामुळे सोयाबीन भातासाठी इतर पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे पिके वाया गेली आहे यामुळे तालुक्यामध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी असा ठराव यावेळी करण्यात आला

तालुक्यामध्ये शेतीसाठी औषधे खते बोगस बियाणे खतांची लिंकिंग यांचा मोठा प्रश्न असून याबाबत शेतकऱ्यांना खते व चांगले बियाणे मिळाले पाहिजे यासाठी कृषी अधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. गॅस वाले ग्राहकांकडून जादा पैसे घेतात याबाबत पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालण्याची गरज यावेळी विषद करण्यात आली
अकोले तालुक्यामध्ये खडी क्रेशर चे वाजवी दर नसल्याने जास्तीची किंमत मोजावी लागते ब्रास मध्ये कमी खडी दिली जात असल्याने तहसील कार्यालय याबाबत कुठलाही निर्णय घेत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली रक्त लघवी तपासणीची ही जादा दराने आकारणी केली जात आहे. मेडिकलचे औषधे जास्त दराने विकले जातात याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. अकोले तालुक्यात पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले असून त्यांची दुरुस्ती करावे असे ठरले. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याबाबद लक्ष देण्याचे काम आहे.
राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडे बंदी तुकडे रद्द केल्याबद्दल तसेच शेत शिवार पांदण रस्ते मोकळे करण्याबद्दल भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ठराव सर्वानुमते मंजूर झाला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दत्ता शेणकर यांनी तर आभार सचिव राम रुद्रे यांनी मानले