इतर

राजूर च्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन मागे


अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील राजूर येथील एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शैक्षणीक संकूल मवेशी येथे सेंट्रल किचन मुंढेगाव येथून विद्यार्थांना पुरवठा केल्या जाणाऱ्या जेवणामध्ये आळया आढळून आल्या होत्या.या अनुशंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात ७ ऑक्टोबर २०२५ पासून हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

विविध संघटना व पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी तात्काळ पाठपुरावा करून आदिवासी विकास नाशिक अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांना पत्र व्यवहार केला आहे.

अप्पर आयुक्तांनी सदर प्रकरणाची चौकशी करून आंदोलन मागे घेण्याचे सांगण्यात आले आहे.मवेशी येथे शासकीय आश्रम शाळा मवेशी आणि आदर्श आश्रम शाळा मवेशी ह्या आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकग्रह मुंढेगाव येथून पुरवठा करण्यात येतो.

पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका कायमचा रद्द करून त्याचा काळ्या यादीत समावेश करावा,जेवण वेळेवर न पोहचणे, जेवणात आळया आढळून येत होत्या त्यामुळे मनसेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन प्रकल्प कार्यालय राजूर येथे करण्यात आले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल मवेशी येथे १५ सप्टेंबर रोजी भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या जेवणाबद्दल समस्या आढळून आल्या.मवेशी येथे वारंवार तक्रारी येत असल्याने भोजन पुरावठ्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे कळाले त्यानुसार कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले.त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी चौकोशी समिती स्थापन करण्यात आली आहे.आदिवासी विकास नाशिक अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी उपोषण कर्त्याना उपोषण करण्यापासून परावृत्त करावे असे सांगितले.तसेच प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे लेखी अश्वासन दिले आहे.यानुसार मनसेने आपले अंदोलन तुर्तास स्थगीत केले आहे.

अहिल्यानगर येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी,उपसरपंच बारी गणेश खाडे,मुकुंद लहामटे,युवानेते सुनिल लोखंडे,युवानेते महेश कोकतरे,नवनाथ करवंदे.यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे,सिकंदर पोपेरे,कॉक्रेट ओमकार नवाळी,के.ए.ग्रुपचे अध्यक्ष अरुण गोंदके, समाजसेवक डॉ.अनंत घाणे,उपसरपंच मदन डगळे सांगवी,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब तळपाडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button