इतर

आदिवासी विकास महामंडळाची जबाबदारी म्हणजे आव्हान पेलण्याची संधी – माजी आमदार वैभव पिचड



“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
अकोले : प्रतिनिधी

‘ स्वातंत्र्याशी निगडीत ठाम लढावू भूमिका घेणाऱ्या वीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या त्यागातून आदिवासी लढा उभा राहिला, तत्कालीन ऐतिहासिक संशोधनातून आलेल्या ओव्या तसेच लोकगीतांतून संस्कृती दर्शन घडले ‘ असे प्रतिपादन माजी आमदार, अमृतसागर दूध संघाचे चेअरमन आणि अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त वैभव पिचड यांनी केले . वीर राघोजी भांगरे यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदी वैभव पिचड यांच्या बिनविरोध निवडी औचित्याने अगस्ती महाविद्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त कॉम्रेड गिरजाजी जाधव होते .

🍁 वीर राघोजी भांगरे यांचा लढाऊ बाणा आणि आदिवासी संस्कृती परंपरेचे योगदान समजावून देताना पिचड पुढे म्हणाले , ‘ लोकनेते जलनायक आदरणीय माजी मंत्री कै. मधुकरराव पिचड तसेच साहित्यिक संशोधक डॉ. गोविंद गारे यांच्या अथक परिश्रमातून, पाठपुराव्यामुळे राघोजी भांगरे यांचा एकूणच लढाऊ संघर्ष तसेच जीवनाचा इतिहास धसास लागला, अभ्यासकांपुढे, समाजापुढे पोचला. अन्याय अत्याचाराने पिचलेल्या उपेक्षितांसाठी जीवाचे रान करणाऱ्या वीर बिरसा मुंडा तसेच राघोजींचा ज्वलंत धगधगता इतिहास प्रेरणादायी, वंदनीय आहे . आदिवासी विकास महामंडळाची संचालक पदी बिनविरोध निवडीमुळे नवे आव्हान पेलण्यासाठी संधी मी यानिमित्ताने स्वीकारली आहे . हाताला काम तसेच हिरडा बेहडा आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन, बाजारपेठ, वितरण व्यवस्था यासंदर्भात कै. मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून व प्रेरणादायी कार्यातून शिकवण घेऊन येणाऱ्या काळात लक्षणीय कार्य करण्याची जबाबदारी आली आहे. यापूर्वीही अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपपदार्थांची निर्मिती तसेच दूधसंघ कर्जमुक्त करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे . बालकुपोषणापासून तर आदिवासी पाड्यातील उत्पादित मालाला उद्योग माध्यमातून गती देताना समस्यांचे निराकरण कै. मधुकरराव पिचड यांनी केले असल्याने हे कार्य पुढे न्यायचे आहे . ‘


” अगस्ती महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असताना गुरुवर्य डॉ. सुनील शिंदे सर आणि डॉ . ताकटे यांच्यासारख्या शिक्षकांकडून लाभलेले शैक्षणिक संस्कार अविस्मरणीय आहेत ” .. असे भावूक गौरवोद्गार वैभव पिचड यांनी काढले .

🍁 अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे स्वीकृत विश्वस्त मधुकर सोनवणे, उद्योजक सुरेश कोते, संपतराव वैद्य यांनी आपल्या सद्भावना व्यक्त करताना वैभव पिचड यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेत आदिवासी विकास महामंडळ संचालक पदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन सदिच्छा व्यक्त केल्या .

☘️ कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे कायम विश्वस्त कॉम्रेड गिरजाजी जाधव यांनी वीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षशील कर्तबगारीचा आलेख मांडला , कै. मधुकरराव पिचड यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्याची वैशिष्ट्ये सांगितली.

💥 अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी प्रास्ताविकात कार्यकारी विश्वस्त वैभव पिचड यांच्या आदिवासी विकास महामंडळ संचालक पदी निवडी निमित्त संस्थेच्या नियोजित सत्कार समारंभामागील भूमिका सांगताना दिवंगत माजी मंत्री कै. मधुकरराव पिचड यांच्या महाविद्यालयीन आणि संस्थात्मक विकास कामांवरील दूरदृष्टीचा विवेचक पट स्पष्ट केला .

स्वागतपर मनोगत आणि संस्थेतील प्रगती अहवाल सादर करताना संस्था अध्यक्ष सुनील दातीर तसेच सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी दिवंगत नेते कै . मधुकरराव पिचड यांच्या पूर्णाकृती पुतळा नियोजित कार्यक्रमाविषयी, वर्षपूर्ती संदर्भात विश्लेषण केले. 

संस्थेच्या वतीने वीर राघोजी भांगरे यांचा अर्धाकृती पुतळा, शाल, पुष्पगुच्छ देऊन वैभव पिचड यांचा सत्कार करण्यात आला .

सत्कार समारंभ प्रसंगी संस्था खजिनदार धनंजय संत ,कार्यकारिणी सदस्य यशवंतराव आभाळे, शरद देशमुख, रमेश जगताप, शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर, एम्.बी. ए. डायरेक्टर डॉ. प्रशांत तांबे, पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ.राजकुमार पल्हाडे, रजिस्ट्रार सीताराम बगाड, डॉ. सुनील शिंदे, डॉ . संजय ताकटे, शिल्पकार यतीन शेटे, डॉ . अशोक दातीर , डॉ.साहेबराव गायकवाड, प्रा.चांगदेव डोंगरे, डॉ . सचिन पलांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते . ☘️💥


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button