कोथळे (ता. अकोले) येथील कोंडीबा गोविंद भांगरे हे बेपत्ता

अकोले प्रतिनिधी
हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कोथळे तालुका अकोले जिल्हा अ.नगर येथून कोंडीबा गोविंद भांगरे ही( 55 वर्ष) वयाची व्यक्ती बेपत्ता झाली आहे दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता गावातून ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे
कोंडीबा गोविंदा भांगरे ( वय 55) वर्षे या बेपत्ता व्यक्तीचा शरीरबांधा पातळ, रंग सावळा, उंची फुट 2 इंच अंदाजे, चेहरा उभा, केस काळे पांढरे, नाक मोठे, कान न टोचलेले, एक डोळा तिरळा. काळ्या रंगाचा टि शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट ,घातलेली आहे अनवाणी पायाने गेला आहे
किसन गोविंद भांगरे यांनी याबाबत राजुर पोलीस स्टेशनला खबर दिली असून त्यावरून 26/2025 अन्वये मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बेपत्ता व्यक्ती कुठे आढळून आल्यास मो.नं. 8275224519 या मोबाईल क्रमांकावर अथवा राजुर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे



