माळी समाजातील वधू-वरांचा अवघ्या एक लाखात होणार शाही विवाह सोहळा!

मुंबई दि23
माळी समाजातील लग्न समारंभातील वारेमात खर्च टाळून अवघ्या एक लाखात शाही विवाह सोहळा साजरा करण्याची अभिनव कल्पना माळी समाजात पुढे आली आहे या विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळ या संस्थेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. आर. चौधरी, नवी मुंबई (९८१९५५५९१६) यांनी दिली
श्री चौधरी यांनी म्हटले आहे की माळी समाजाला गावगाडयात पूर्वी फार महत्व होते. जर एखादया गावात माळयाची दोन तीनच घरे असतील तरीही त्यांच्याकडे लोक सल्ला मसलत करण्यासाठी येत असत. ही परिस्थिती १९४५ सालापर्यंत होती. पण जसा राजकीय वातावरणाचा बदल झाला. तसा या परिस्थितीत बदल झाला. निवडणूकीच्या
स्पर्धेमध्ये माळी समाज मागे पडला. पुर्वी जातीय समीकरणे नव्हते. पण स्वातंत्र्यानंतर
जातीय समीकरणे प्रबल झाले. त्यात समाज पूर्ण मागे पडला. त्यातच समाजात बदल व्हायला पाहिजे होता. तसा झाला नाही. त्यात मूळ धंदा शेती असल्यामुळे त्यात आणखी अधोगती झाली. सर्वसाधारण शेती हा तोटयाचा धंदा आहे. कमी शिक्षण, गुणात्मक शिक्षणाचा अभाव अंधश्रध्दा, धर्माच्या चुकीच्या रूढीचा प्रभाव आणि त्यास होणारा खर्च या सर्वामुळे समाज पूर्ण बरबाद झाला. सर्वात मोठी चूक म्हणजे लग्न, वर्षश्राध्द, बारसे, वाढदिवस आणि अनेक अंधश्रध्देवर अवलंबून असलेल्या गोष्टीवर वारेमाप कर्ज काढून केलेला खर्च या सर्वाचा परीपाक म्हणजे समाजाची आर्थिक, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक यामुळे झालेली अनन्वीक हाणी.
आज मुलामुलींचे लग्न जमविणे आणि ते करणे हे फार अवघड झाले आहे. त्यातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न समाजातील काही व्यक्ती करत आहेत. पुणे येथील मॅग्नोलीया ही एक समाज उपयोगी संस्था आहे. ही सावित्रीमाईच्या विचाराने प्रेरीत झालेली संस्था आहे. या संस्थेने लग्नात कमी खर्च व्हावा म्हणुन सामुदायिक विवाह करण्याचे ठरविले आहे
असा सामुदायिक विवाह दि. ०८/०२/२०२६ रोजी कपीला रिसॉर्ट, खराडी, पुणे येथे करण्याचे ठरविले आहे. यात विवाह, साखरपुढा, हळदीचा कार्यक्रम होणार आहे
विवाह -रविवार दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२४ 2026 साखरपुडा- सकाळी ९ ते १०
हळदी समारंभ- सकाळी ११ ते १२
स्नेहभोजन- दुपारी १२ ते २
विवाह -दुपारी ४.०० वाजता
या विवाहात नोंदणी करून सहभागी होण्यासाठी
नियम आणि अटी :-
- वधु-वरांनी प्रत्येकी रु. ५१,०००/- हजार द्यायचे.
- त्यामध्ये मंडप, स्टेज, गुरूजी, वाजंत्री, हार-गुच्छ व २०० लोकांचे स्वादिष्ट जेवण.
- वधु वरांसाठी तयार होण्यासाठी स्वतंत्र ए.सी. खोल्या, फोटोग्राफर, शुटींग
इत्यादीची व्यवस्था करण्यांत येईल. - सर्व लग्न शाही थाटात करण्यात येईल.
- या सामुदायिक शाही विवाह सोहळ्या मुळे वधू वरांचे कमीत कमी रू.१०,लाखा पेक्षा अधिक रुपये वाचतील.
तरी माळी समाजातील सर्वांनी आपले नावे खालील व्यक्तींकडे नोंदवावीत.
१) नुतन बनकर-९८२२५१२१७७
२) गौरी ढोले पाटील-९८९०९७९८१७
३) अनिता डोमाळे -९८५०२६२८५७
मॅग्नोलिया हा सावित्रींच्या लेकीचा समाजउपयोगी काम करणारा ग्रुप आहे. सुरुवातीला या उपक्रमात माळी समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन
समाजसेवक.
१) के. आर. चौधरी, नवी मुंबई९८१९५५५९१६
२) राजेंद्र कर्णे, नवी मुंबई८०८२६६१२९२
३) वामण गार्डे, नवी मुंबई९६६४२८७५४३
४) ज्ञानेश्वर महाजन, नवी मुंबई९३२१२१८४५६
५) हेमलता क्षिरसागर, नवी मुंबई९८९२८६५७०९
६) सूर्यकांत थोरात, नवी मुंबई ९१६७६७४८४०
७) वृषाली भुजबळ, ऐरोली, नवी मुंबई८८५००४९४५६ यांनी केले आहे
आपण वाचवलेले पैसे जर डी-मॅट अकाउंट ओपन करून त्यात टाकले तर ४० वर्षानंतर त्यांच्या कुठल्याही पिढीला पुढे काम करण्याची गरज पडणार नाही.के आर चौधरी,मुंबई
9819555916




