होय मी त्या इसमाच्या कानाखाली मारली- आमदार डॉ. किरण लहामटे.

या कृत्याचा मला पश्चाताप होत नाही.
अकोले प्रतिनिधी
शेतीला दिवसा वीज द्या अशी मागणी करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या लिंगदेव तालुका अकोले येथे आमदार लहामटे यांनी कानाखाली लगावली या घटनेचा सध्या अकोले तालुक्यात चर्चेचा विषय सुरू असतानाच आमदार किरण लहामटे यांनी याबाबत जाहीर खुलासा केला आहे
लहामटे यांच्या विरोधात अकोले येथे महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलनदेखील करण्यात आले व आमदार लहामटे यांचा यावेळी निषेध करण्यात आला होता
. या घटनेबाबत आमदार लहामटे यांनी तालुक्यातील उंचखडक बु. येथील श्री क्षेत्र राममाळ येथे कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी जाहीर खुलासा केला.
कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र लिंगदेव येथे लिंगेश्वर मंदिर प्रांगणात वाचनालयाचे उद्घाटन होते. तेव्हा
हे मद्यपी कार्यक्रमात होते. ते आर्वाच्य भाषेत काय बोलले हे उपस्थितांनी ऐकले आहे. माझा स्वीय सहाय्यक , गाडीचालक,पंधरा-सोळा गावकरी साक्षीदार आहेत.
पहिल्यांदा दुर्लक्ष केले, नंतर मी वाहनाकडे जात असताना तो मद्यपी पुढे आला आणि हातात हात घेऊ पाहत होता. एकादशीचा दिवस, जागृत लिंगेश्वर देवस्थान प्रांगण आणि
समोर मद्यपी यामुळे माझा संयम राहिला नाही.आणि मी त्याच्या कानाखाली लगावली असे आमदार लहामटे म्हणाले
आमदार शोभेची वस्तू नाही, लोकांनी सार्वजनिक विकासकामे करण्यासाठी निवडून दिलयं, हे मी जपतोय, कामे करतोय. तालुक्यात मद्यपीसाठी मोर्चे निघतात हे आश्चर्य असून, त्या मद्यपीने दारू सोडली तर मी आजही त्याची जाहीर माफी मागायला तयार! असे आमदार लहामटे म्हणाले.
यावेळी अशोक देशमुख, विठ्ठलपंत गोंडे महाराज, अक्षय आभाळे, महिपाल देशमुख, प्रशांत बंदावणे, तान्हाजी देशमुख, बाळासाहेब वाकचौरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
———




