अकोल्याच्या पर्यटन पंढरीत नववर्षाच्या स्वागताची रेलचेल! वन्यजीव आणि पोलीस प्रशासन अलर्ट!

अकोले प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ भंडारदरा, फोपसंडी, कळसुबाई,हरिश्चंद्रगड परिसरात थर्टी फर्स्ट साजरे करताना पोलीस आणि वन्यजीव विभागाची करडी नजर राहणार आहे
दिलेल्या नियमांचे पालन करून मनसोक्त आनंद घ्या मात्र नियमांचे पालन न करणाऱ्याना कायदेशीर कारवाईला सामोरे बजावे लागेल असा इशारा राजूर पोलिस आणि वन्यजीव विभागाने दिला आहे.
हरिश्चंद्रगड कळसुबाई, अभयारण्यात वन्यजीव भंडारदरा वनविश्रामगृह शेंडी येथे ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने पोलिस, वन्यजीव विभाग, हॉटेल मालक व टेंटधारक यांची
संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावीत, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.व पर्यटक व व्यावसायिकांना मार्गदर्शक सूचना केल्या
टेन्ट कॅम्पिंग,हॉटेल होमस्टेमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांची आधारकार्डासह नोंद रजिस्टरमध्ये घेणे अनिवार्य असेल.
अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीवांना त्रास होईल अशा लाईट डेकोरेशनचा वापर करण्यास पूर्णतः बंदी असेल. डीजे व तत्सम मोठ्या आवाजातील ध्वनीयंत्रास बंदी.फटाके वाजवण्यास पूर्णत बंदी.
पर्यटकांना रात्री जंगल क्षेत्रात फिरण्यास बंदी असेल. मद्यपान करण्यास बंदी अभयारण्य क्षेत्रात मद्यपान / धूम्रपान तसेच कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सेवन करण्यास पूर्णतः बंदी असेल. आढळून आल्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टेन्ट कॅम्पिंग,हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून अभयारण्य क्षेत्रातील शांततेचा भंग होणार नाही. जसे मोठ्याने किंचाळणे, ओरडणे याची दक्षता घेणे. पर्यटकांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झाला किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस टेंट कॅम्पिंग, हॉटेल मालक यांना जबाबदार धरण्यात येईल. कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगण्यास पूर्णतः बंदी असेल.अशा सूचना पोलीस व वन्यजीव प्रशासनाने दिल्या आहेत
2025 या सरत्या वर्षाला निरोप आणि आणि येणाऱ्या 2026 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भंडारदरा, हरिचंद्रगड कळसुबाई शिखर तसेच अतिदुर्गम फोपसंडी परिसरात परिसरात दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला हजारो पर्यटक येत असतात 30 डिसेंबर ते 1 जानेवारी यादरम्यान तीन ते चार दिवस पर्यटकांची मोठी रेलचेल अकोल्याच्या पर्यटन पंढरीत असते
———–



