इतर

विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री मुकेश पवार उपाध्यक्षपदी भाऊसाहेब वाकचौरे

कार्याध्यक्षपदी शरद पवार,गोरक्ष कदम यांची निवड


रुंभोडी प्रतिनिधी

अकोले येथे सुतार समाजाच्या व कार्यकर्त्यांच्या आर्थिक योगदान धुमाळवाडी येथे तालुकास्तरीय भगवान श्री विश्वकर्मा मंदिराचे काम चालू आहे मंदिराच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी समाजातील कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे व तरुणांच्या दबावामुळे या कामास नुकताच मुहूर्त मिळाला गेल्या नऊ ते दहा वर्षापासून समाजातील गट तट मी पणा अहंकार श्रेय ह्या गोष्टी आपापसातील हेवेदावे व मतभेद यामुळे मंदिराचे काम रखडले होते मात्र नव तरुणांच्या व ज्येष्ठांच्या विचारसरणीने पुन्हा एकदा त्याला चांगले स्वरूप प्राप्त झाले

समाजाचे ज्येष्ठ नेते ह भ प भाऊराव मारुती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व समावेशक निर्णय घेण्याचे ठरले त्यानुसार इच्छुक अध्यक्ष पदासाठी स्वतःहून भाऊसाहेब वाकचौरे व मुकेश पवार यांनी आपले नाव जाहीर केले मात्र कोणते मतदान व निवडणूक न घेता रोशात्मक गोष्टी नको म्हणून श्री भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जनतेतून एका विश्वस्तांनी जाहीर केले मात्र मुकेश पवार हे जाहीर करताच मुकेश पवार आक्रमक होऊन निघून चालले होते मात्र ज्येष्ठांनी मध्यस्थी करत मुकेश पवार यांची मनधरणी केली व श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उपाध्यक्ष पद माझ्याकडे द्या माझे काही हरकत नाही असे म्हणत सर्वाना विश्वास दिला व सर्वांनी या निर्णयाचे कौतुक केले व अखेर मुकेश पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषित केले

यावेळी अध्यक्ष म्हणून मुकेश विठ्ठल पवार उपाध्यक्ष भाऊसाहेब सिताराम वाकचौरे सुनील मधुकर गोरे कार्याध्यक्ष शरद भिमाजी पवार गोरक्ष बन्सी कदम खजिनदार प्रदीप ज्ञानेश्वर कदम विनोद पांडुरंग शिरसाट सचिव नितीन भाऊसाहेब वाकचौरे एनटी कदम सर प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाऊसाहेब अण्णासाहेब वाकचौरे प्राचार्य आदिनाथ सुतार सर संपर्कप्रमुख प्रा ह भ प दीपक राऊत सर निवृत्ती सूर्यवंशी सल्लागार ह भ प भाऊराव मारुती जाधव रामनाथ गणपत कदम बाळासाहेब निवृत्ती वाकचौरे रामनाथ छबुराव सूर्यवंशी संजय मधुकर सूर्यवंशी बापूसाहेब लक्ष्मण गोरे अशोक गजानन वाकचौरे आदींची निवड करण्यात आली यावेळी प्रत्येक विभागातून उपस्थित असलेल्या विश्वस्त म्हणून ट्रस्टमध्ये सामावून घेण्यात आले यावेळी प्राचार्य किरण भागवत सर यांनी या बैठकीचे प्रास्तविक केले सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून संघटितपणे समाजाच्या कामासाठी एकत्र यावे व विश्वकर्मा मंदिराची काम अत्यंत गतीने करावे अशी आवाहन केले त्यांनी अतिशय आक्रमकपणे समाजाच्या हितासाठी अभ्यासपूर्ण प्रबोधन केले यावेळी भाऊराव जाधव उज्वलाताई राऊत रामनाथ कदम संजय सूर्यवंशी पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे श्रीपाद भालेराव राहुल राऊत निवृत्ती सूर्यवंशी बाळासाहेब वाकचौरे रामनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वतःहून मंदिराच्या आर्थिक निधीची घोषणा केली तसेच उत्साही कार्यकर्त्यांनी रोख रक्कम सचिव नितीन वाकचौरे यांच्याकडे जमा केली किरण भागवत यांनी सर्वांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button