संग्राम पतसंस्थेला ३ कोटी ४१ लाख रुपये चा नफा!

संगमनेर प्रतिनिधी
:नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणारी व संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या संग्राम पतसंस्थेस सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ३ कोटी ४१ लाख रु. इतका नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली.
हा नफा सर्व तरतुदी वजा जाता आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांच्या विश्वासामुळे संस्था असे लक्ष्य साध्य करू शकली अशी भावना यावेळी चेअरमन यांनी व्यक्त केली तसेच त्याबद्दल सर्व ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांचे आभार देखील व्यक्त केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीत, मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व मा. आ. सत्यजीतदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आपला आलेख उंचावत ठेवला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही संस्थेने परंपरा कायम ठेवत आपल्या कामगिरीचा व विश्वासार्हतेचा ठसा उमटविला.सहकार क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाणारी संग्राम नागरी सहकारी पतसंस्था मर्या., संगमनेर यांनी चालू आर्थिक वर्षात सर्वांगीण प्रगती साधत आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. सक्षम व्यवस्थापन, पारदर्शक कारभार आणि सभासद-केंद्रित सेवा यामुळे संस्थेने प्रगतीचा नवा उच्चांक गाठला आहे.संस्थेने यावर्षी एकूण ₹. ३ कोटी ४१ लाखांचा निव्वळ नफा मिळवला असून आर्थिक शिस्त आणि योग्य नियोजनाचे हे फलित मानले जात आहे.
संस्थेचे वसूल भाग भांडवल ₹. १ कोटी ८७ लाखांवर पोहोचले असून नवीन सभासदांची नोंदणीही लक्षणीय वाढली आहे.गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास लक्षात घेता, संस्थेकडे एकूण ₹. १५६ कोटीं ३५ लाख ठेवी जमा झाल्या आहेत. सुरक्षितता आणि आकर्षक व्याजदरामुळे ठेवीदारांचा ओढा सातत्याने वाढत आहे. तसेच संस्थेने विविध ठेवी योजनांद्वारे नागरिकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे.कर्ज वितरणाच्या बाबतीत संस्थेने उत्कृष्ट कामगिरी करत ₹. १३३ कोटीं १ लाख कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे स्वनिधी ₹. २७ कोटीं ६८ लाख तसेच एकूण गुंतवणूक ₹. ५५ कोटीं ४७ लाख असून एकत्रित व्यवसाय ₹. २८९ कोटीं ३६ लाख झाला आहेत. त्यामध्ये सोनेतारण कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढले असून संस्थेवर विश्वास वाढत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक गरजा जलद आणि सुलभ पद्धतीने पूर्ण होत आहेत अशी माहिती संस्थेचे व्हा. चेअरमन इंजि. विजय गिरी यांनी दिली.विशेष म्हणजे, संस्थेने कर्जवाटप करताना पारदर्शकता आणि नियमबद्धता कायम ठेवत एनपीए (थकीत कर्ज) नियंत्रणात ठेवले आहे, ज्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे.आगामी काळात अधिक नावीन्यपूर्ण योजना, शाखा विस्तार आणि ग्राहकाभिमुख सेवा देऊन सहकार क्षेत्रात आघाडी कायम ठेवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला असून लवकरच संस्थेचे मुख्य कार्यालय स्वमालकीच्या भव्य इमारतीत स्थलांतर होणार आहे. ग्राहक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल सेवा, जलद व्यवहार प्रणाली आणि सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. संस्थेच्या वार्षिक आढावा सभे प्रसंगी मा. संचालक मंडळ डॉ. नाजिमुददीन शेख, श्री. विलास दिघे, डॉ. माणिकराव शेवाळे, श्री. सुर्यकांत शिंदे, श्री. नानासाहेब वर्पे, श्री. दत्तात्रय आरोटे, अॅड. प्रशांत गुंजाळ, श्री. श्रीकांत कोकणे, श्री. सुदिप वाकळे, डॉ. सुचित गांधी, श्री. उमेश बोटकर, श्री. सोमेश्वर दिवटे, सौ. सुलभाताई शिवाजीराव दिघे, सौ. सुनंदाताई मच्छिंद्र दिघे, श्री. अनिल सातपुते, सी. ए. अमित कलंत्री व श्री. प्रकाश गुंजाळ अधिकारी व कर्मचारी यांचे समन्वयित प्रयत्न आणि सभासदांचा विश्वास हे मुख्य कारण असल्याचे मत व्यवस्थापक श्री. उमेश शिंदे यांनी व्यक्त केले.


