राज्यातील माळी समाजातील नवनिर्वाचित सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा!

मंत्री छगन भुजबळ, ना.जयकुमार गोरे,ना.अतुल सावे, यांची उपस्थिती
पुणे दि 14 -माळी विकास मिशन आयोजित माळी समाजातील राज्य भरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका मधील )सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा व प्रबोधन शिबिर 2026 उदघाटक ह.भ.प. सावता महाराज वसेकर आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे हस्ते होणार आहे
प्रमुख पाहुणे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे,बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांचे शुभ हस्ते हा सत्कार सोहळा पार पडणार आहे
यावेळी श्री. महेश झगडे (सेवानिवृत्त IAS ),श्री. शेखर गायकवाड (सेवानिवृत्त IAS ) यांचे मार्गदर्शन होणार आहे तर यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, मा. आ. उमेश उर्फ चंदू यावलकर,आ. डॉ. प्रज्ञाताई सातव,मा. आ. कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
रविवार दि.31 मे 2026 सकाळी 10:30 ते 5:30 सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, पुणे.येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माळी विकास मिशनचे श्री के. आर. चौधरी, (मुंबई )अशोक भुजबळ (तळेगाव, पुणे),इंजि. वासुदेव चौधरी,डॉ. श्रीकृष्ण ढोणे (ठाणे),संतोष भोजने (धाराशिव),प्रा. अमृतराव काळोखे (सातारा, ) ,राजेंद्र अहिरे (नाशिक),गोविंद डाके (जालना, पुणे),ऍड मिलिंद घोडेकर (नारायणगाव, पुणे),उमेश महाजन (जळगांव), विलास इंगळे (अकोला) ,शरद वऱ्हेकर (अमरावती) नामदेव जाधव (धुळे),डॉ अरुणा माळी (कोल्हापूर),शीतल साखरे (गेवराई, बीड) यांनी केले आहे
=======

