इतर

पठार भागातील विकास कामांचा निधी माजी मंत्री थोरात यांच्या काळातील,लोकप्रतिनिधीने आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये–सौ मीराताई शेटे

संगमनेर ( प्रतिनिधी)--संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील विविध गावांबरोबरच साकुर ते बिरेवाडी रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळातील ऑक्टोबर 2024 मंजूर झालेला आहे. नवीन लोकप्रतिनिधीने एक रुपयाही निधी मिळवला नसून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम बंद करा अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ मीराताई शेटे यांनी केली आहे.

बिरेवाडी येथे पालकमंत्री व नवीन लोकप्रतिनिधी यांनी काल ऑक्टोबर 2024 पूर्वी मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ केला याबाबत बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मीराताई शेटे म्हणाल्या की, साकुर पठारातील दिग्रस ते रणखामवाडी हे काम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या 25 15 या निधी अंतर्गत होते. साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी या सुमारे 17 कोटींच्या रस्त्याच्या कामासाठी आपण लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला.

ही सर्व कामे 2024 पूर्वीच मंजूर झालेली आहे. याबाबतची सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. ही कामे मंजूर होण्यासाठी यशोधन कार्यालय व इंद्रजीत भाऊ थोरात यांची मोठी मदत झाली मंत्रालयापर्यंत या कामांच्या निधीसाठी पाठपुरावा केला.

नवीन लोकप्रतिनिधी मागील दीड वर्षापासून काम करत आहे .मात्र एक रुपयाचा ही नवीन निधी त्यांनी आणलेला नाही. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली अनेक रस्त्यांची कामे त्यांनी रद्द केली. कोणतीही नवीन काम आणले नाही आता त्यांनी निधी आणावा आणि खुशाल उद्घाटने भूमिपूजन करावी मात्र जुन्या कामावर भूमिपूजन करू नये

तालुक्यावर बाह्य शक्तींचे आक्रमण असून नवीन लोकप्रतिनिधी स्वतः काही करू शकत नाही हेच सर्व जनतेला माहित आहे. पठार भागातील ज्या लोकांची कामांमध्ये योगदान नाही अशा लोकांना घेऊन नवीन लोकप्रतिनिधीने भूमिपूजन व उद्घाटनाचा घाट घातला हे अत्यंत चुकीचे आहे.

आम्ही आणलेल्या निधीच्या व केलेल्या कामाचं कोणतेही श्रेय न घेता नवीन निधी आणावा अशी मागणी करताना आयत्या पिठावर रेघोट्या मारणं बंद करा अशी आवाहनही त्यांनी केले आहे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली मात्र ऑक्टोबर 2024 नंतर नवीन लोकप्रतिनिधीने सर्व कामे रद्द केली. नवीन एक रुपयाचा निधी आणला नाही जुन्याच कामांचे उद्घाटने सुरू केले आहेत. काम न करता प्रसिद्धी करणे फ्लेक्स लावणे हेच कामे नवीन सत्ताधारी करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button