इतर

कोतुळच्या  पूजाने अखेर  ध्येयाला गवसणी घातली 

अकोले प्रतिनिधी 

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील  अशोक नारायण  शेळके,व सौ शांता अशोक शेळके यांची सुकन्या कु,पूजा( रोहिणी)अशोक शेळके हिने सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत  बाजी मारली असून, तिला गव्हर्नमेंट  मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथील शासकीय नोकरीचा आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुभ हस्ते  दि 29 मे 2026 रोजी कोल्हापूर येथे देण्यात आला,

 कु, पूजा शेळके हि  2 ते 3 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचे पेपर देत होती, अत्यंत थोड्याशा गुणांनी तिला अपयशाला सामोरे जावे लागत होते, पण तिने आपली जिद्द, व चिकाटी सोडली नाही, वेळोवेळी ती नव्या ताकदीने नवी दिशा व नवी आशा घेऊन मी उभी राहत होती,आणि अखेर ऑगस्ट 2025 च्या परीक्षेतील निकालात तिने भरघोस यश संपादन केले,व

29 मे  2026 रोजी तिची शासकीय नोकरीसाठी  कोल्हापूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे निवड झाल्याचे  आदेश पत्र महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा, हसन मुश्रीफ यांचे हस्ते कोल्हापूर येथे सन्मानपूर्वक देण्यात आले,

     अभ्यासात अनेकदा अडचणीत आणणारे प्रश्न असतात, पण त्याचे समाधानकारक उत्तर शोधून काढणे, हे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान असते  असे पूजा सांगते, अनेकदा पेपर लिहून झाल्यावर सुद्धा आपण कुठे कमी पडलो, हे शोधून त्यावर त्रुटी शोधणे हे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे ध्येय असले पाहिजे,

 प्रबळ आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द,व अभ्यासातील सातत्य विद्यार्थ्याला त्याच्या  ध्येयापर्यंत पोचवतात, अशी पूजा सांगते, अनेकदा अभ्यासाचा कंटाळा, थकवा, अवघड प्रश्न,  मनात घोंघावत असूनही शासकीय नोकरीचे सोनेरी  स्वप्न तिला अभ्यासाकडे खेचून नेत होते

 वडील  पेंटर, व आई विडी कामगार असूनही  मुलांनी स्पर्धा परीक्षेतुन शासकीय नोकऱ्यांना जवळ केले आहे,

 त्यांचा मुलगा शिवा संतोष शेळके  तर एम पी एस सी स्पर्धा परीक्षेत तीन वेळा उत्तीर्ण झाला, मंत्रालयीन अधिकारी/, विक्रीकर आयुक्त/, डी वाय,एस,पी/, ए,आर,टी,ओ या विविध पदांचा अनुभव तो घेत असून तो महाराष्ट्र शासनाचा  क्लासवन अधिकारी बनला आहे,

      पूजा शेळके हिच्या  निवडीचे, तालुक्याचे  आमदार, डॉ किरण लहामटे, पत्रकार  डॉ, विश्वासराव आरोटे, लिज्जत  पापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते, कोतुळचे उप सरपंच संजय देशमुख, बबलू देशमुख, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, संजय लोखंडे, गणेश पोखरकर,  पत्रकार सुनील गीते,  विनय समुद्र,डॉ, अभिजित देशमुख, रवींद्र आरोटे, व ग्रामस्थांनी अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button