इतर

अंभोळ येथे वीज चोरी शोध पथकावर हल्ला अकोले पोलिसांत गुन्हा दाखल.

अकोले / प्रतिनिधी:
अकोले तालुक्यातील अंभोळ येथे वीज चोरी शोध मोहिमेदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीचे कोतूळ कक्ष कार्यालया अंतर्गत पथक अंभोळ येथे अनधिकृत वीज वापर व वीज चोरीची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तपासणी वीज चोरी तपासणी दरम्यान वीज ग्राहक प्रभाकर बापूराव साबळे यांच्या घरातील वीज मीटर मध्ये घरातील वीज वापराची नोंद होऊ नये या हेतूने साबळे वीज मीटरची ऑउट गोइंग वायर इनकमिंग वायरला जोडून वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनात आल्याने महावितरणचे सहाय्यक अभियंता हर्षल मांडगे यांनी वीज चोरीची कार्यवाही सुरु केली .यावेळी वीज ग्राहकाचा मुलगा भागवत साबळे याने आर्वाच भाषेत शिवीगाळ करून खोर्याच्या दांड्याने मारण्याचा प्रयत्न केला व वीज कर्मचारी यांना मारहाण व धक्काबुक्की केली. आहे. यावेळी संबंधितांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली .
घटनेनंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी अकोले पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र काही राजकीय पुढार्यांच्या हस्तक्षेपामुळे तब्बल तीन तासांहून अधिक काळ उलटूनही गुन्हा दाखल होण्यास विलंब होत होता. त्यामुळे महावितरण कर्मचारी आक्रमक झाले.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे विभागीय सचिव अमोल आभाळे यांनी कार्यकारी अभियंता, संगमनेर यांच्याशी संपर्क साधून घटनेचा निषेध केला. तसेच संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन काम बंद आंदोलन सुरु केले.
दरम्यान, कोतूळ व ब्राम्हणवाडा कक्षातील सर्व महावितरण कर्मचारी अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाले असून आरोपीवर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.
राजकीय विरोधाला न जुमानता पोलीस उप निरीक्षक मोहन बोरसे यांनी सहाय्यक अभियंता हर्षल मांडगे यांच्या फिर्यादी नुसार शासकिय कामात अडथळा ,व वीज चोरीचा गुन्हा दाखल केला.
👉वीज ग्राहकांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते अधिकारी व कर्मचारी सध्या कंपनीवरील आर्थिक संकटामुळे थकीत बिलाची वसुली मोहीम व वीज चोरी शोध मोहीम राबवीत आहेत. त्यात थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.या सरकारी कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण धक्काबुक्की चे प्रकार होत असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ फौजदारी कार्यवाही करण्यात येत आहे प्रदीप वट्टमवार कार्यकारी अभियंता संगमनेर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button