मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु ,आंबीत लघु प्रकल्प ओव्हर फ्लो!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील मुळा नदी उगम परिसरात असणारे आंबीत धरण आज रविवारी 27 जून ला सकाळी ओव्हर फ्लो झाले
2024 ला आंबीत धरण 28 जून ला भरले होते तर मागील वर्षी आंबीत धरण 27 मे 2025 ला भरले होते या वर्षी एक महिना उशिरा धरण भरले आहे
मुळा नदी उगमा जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण आज ओव्हरफ्लो झाले
जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे जिल्ह्यातील पहिले धरण ठरले आहे मान्सून पूर्व दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे आंबित या लघु प्रकल्पाची साठवण क्षमता 193.97 दशलक्ष घनफूट आहे धराणा तून सुमारे 200 कुसेस चा विसर्ग मुळा नदी पत्रात सुरु असून हा विसर्ग कोतुळ जवळ असणाऱ्या पिंपळगाव खांड धरणाचे दिशेने झेपा वला आहे
घाटमाथ्यावर तसेच अकोले तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला आहे शनिवारी रात्री मुळा नदी पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला यामुळे आंबीत धरण ओव्हर फ्लो झाले यामुळे मुळा नदी वाहती झाली आहे
असून मुळा नदीचा प्रवाह पुढे 600 दल घ फु साठवण क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणात स्थिरावणार आहे मुळा व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाल्याने 11 टी एमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात ही नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे
=======


