आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशसंपर्क प्रमुख पदी सचिन देशमुख यांची नियुक्ती

अकोले प्रतिनिधी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या प्रदेश संपर्क प्रमुख पदी अकोले तालुक्यातील राजूर येथील युवक कार्यकर्ते सचिन गणपतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे
तर अहिल्या नगर जिल्हा संघटक सचिव पदावर लालू भांगरे , जिल्हा संघटक पदावर गंगाराम धिंदळे यांची तर डॉक्टर फोरम च्या अहिल्यानगर जिल्हा संघटक पदावर डॉ. रामनाथ मुठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन देशमुख यांचा आदिवासी समाजात असलेला दांडगा जनसंपर्क तसेच दुर्बल शोषित पीडितांवरील अन्याय अत्याचाराप्रती सामाजिक लढे आणि आरोग्य शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती साठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक प्रबोधन यासह आर्थिक मदत करणे त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस अखील भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली त्यानुसार अभाआविपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रामसाहेब चव्हाण
यांनी सचिन गणपतराव देशमुख यांची प्रदेश जनसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली. अभाआविपचे प्रदेश महासचिव केशव तिराणिक आणि मुंबई कोकण विभागाचे विभागीय अध्यक्ष रामनाथ भोजने यांचे शुभहस्ते सचिन देशमुख यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. श्री सचिन देशमुख तसेच लालू भांगरे गंगाराम धिंदळे रामनाथ मुठे यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
========


