पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा, सचिव – ममता तलकोकूल सचिव तर कल्पना कट्टा कार्याध्यक्ष

सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’ या सामाजिक संस्थेच्या २०२६ – २७ या वर्षासाठी नूतन अध्यक्ष म्हणून भाग्यलक्ष्मी तुम्मा यांची निवड करण्यात आली आहे
इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे : ‘उपाध्यक्ष’ – पल्लवी संगा, आरती आडम, मंजुळा दुधगुंडी; ‘सहकार्याध्यक्ष’ – गीता भूदत्त, संगीता बोडा, कल्पना कैरमकोंडा; ‘सहसचिव’ – वनिता सुरम, उमा गज्जम, वंशिका जक्का; ‘खजिनदार’ – हेमा मैलारी; ‘सहखजिनदार’ – लावण्या मच्छा; ‘समन्वयिका’ – अंबुबाई पोतू, कविता साखरे; ‘सल्लागार’ – कला चन्नापट्टण, सविता येदूर; ‘कार्यकारिणी सदस्य’ – अंबिका म्याकल, रोहिणी संगा, रजनी जिल्ला, लता कुंदारम, प्रिती बोगा, वर्षा चिप्पा, सुनिता कोंकाटी, सुरेखा आडम, लक्ष्मी गाजूल यांची निवड संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केले. यावेळी नूतन अध्यक्ष भाग्यलक्ष्मी तुम्मा म्हणाल्या, ‘आमच्या पद्मशाली सखी संघम’च्या सर्वांना सोबत घेऊन पद्मशाली समाजासह इतर समाजातील महिलांसाठीही सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले आहे’. याप्रसंगी फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, सदस्य ओमसी पल्ली आदी उपस्थित होते.
पद्मशाली समाजातील महिलांना नवीन सदस्य होण्याची संधी ३१ ऑगस्ट पर्यंत देण्यात येत असून त्यांनी ९०२१५५१४३१ या व्हाटसॲपवर नाव व पत्ता लिहून पाठवावेत. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित असणे आवश्यक आहे.



