मारुती कमळू फापाळे (एम्. के. सर) यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील बेलापूर येथील श्री. मारुती कमळू फापाळे (एम्. के. सर) यांचे निधन झाले
त्यांचा जन्म – 1 मार्च १९४६ रोजी बेलापूर ता. अकोले जि. अहिल्यानगर गावामध्ये झाला. जुन्या अकरावी पर्यंतचे शिक्षण श्री. रामदास हायस्कूल बेलापूर मधून घेऊन गुरुवर्य आंधळे सर यांच्या आशिर्वादाने रयत शिक्षण संस्थेमध्ये ३६ वर्षे सेवा करून फेब्रुवारी २००४ साली हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत निवृत्ती झाली.
पत्नी इंदूबाई, मुले सुभाष आणि बाळासाहेब, मुली संध्या, उज्ज्वला, पुष्पा तसेच सर्व जावई, सुना आणि नातवंडांवर तुम्ही खूप आपुलकीने वागणूक दिली, आणि संस्कार दिले. आणि हे सर्व तुमच्या संस्काराची शिदोरी जपत आहे.
सामाजिक जीवनातही आपण विविध संस्थांवर अध्यक्ष म्हणून काम केले. आपण कमलामाता दुधसंस्था, वि. वि. सोसायटी, समर्थ नागरी पतसंस्था, तंटामुक्ती समिती, श्री रामदास हायस्कूल कमिटी बेलापूर इ. संस्थांवर काम करून सहकार क्षेत्रातही दिशा देण्याचे त्यांनी काम केले.



