इतर

यशस्वी व सुखी जीवनासाठी आरोग्यदायी जीवनशैली महत्त्वाची- पुनम आचार्य

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित ‘रोटरी क्लब हब’ च्या विशेष सत्रात प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आणि मार्गदर्शक सौ. पूनम आचार्य यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

दैनंदिन जीवनात संतुलित आहाराचे महत्त्व,शरीरासाठी प्रथिनांचे (प्रोटिन्स ) पुरेसे प्रमाण आणि निरोगी जीवन शैली कशी राखावी यांचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.तसेच त्यांनी उपस्थितांकडून विविध प्रकारचे व्यायाम प्रकार, शरीर बळकट करण्यासाठीच्या विविध व्यायाम पद्धती आणि स्ट्रेचिंग चे प्रात्यक्षिक करून घेतले. आरोग्य हीच खरी संपत्ती असून तोच सुखी व यशस्वी जीवनाचा खरा मूलमंत्र आहे,असे त्यांनी प्रतिपादन केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पल्लवी देशपांडे यांनी सौ पुनम आचार्य यांचा परिचय करून दिला तर सेक्रेटरी ऋषिकेश संम्मनवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाला हेमराज राजपूत, सोनाली चिंधडे,स्मिता अपशंकर, राज तलरेजा, सौ तलरेजा, दिलीप बेनिवाल, चेतन पवार, सोनाली कोतकर, दीपक कोतकर,प्राची चौधरी तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी व ग्राहक उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम उदोजी मराठा स्कूल येथे संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button