इतर

सीनिअर जर्नालिस्ट  च्या मुंबई कार्यालयाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते बुधवारी उद्घाटन

अहिल्यानगर प्रतिनिधी 

 : ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्थरावर कार्यरत असलेल्या ‘ सीनीअर जर्नालिस्ट असोसिएशन’च्या मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते  बुधवारी (दि.२१) होत आहे. असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष यादवराव पावसे  यांनी दिली  

वर्सोवा, अंधेरी (पश्चिम ) येथील अंबेमाता मंदिरासमोर, १९१, आरामनगर, आरडीएक्स स्टुडिओ बंगला, पार्ट- २ या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते हा समारंभ संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून असोसिएशनचे  पदाधिकारी तसेच पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी, हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या विविध भागातून मुंबईत कामासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी कार्यालयात असोसिएशनच्या  कामकाजासाठीची सुविधा या ठिकाणी करता येणार आहे.

असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ. जयपाल पाटील, संस्थापक विश्वस्त आणि माजी अध्यक्ष डॉ. राम अग्रवाल, उपाध्यक्ष व विश्वस्त मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त आणि सरचिटणीस संजयकुमार जोशी, कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, विधी सल्लागार एडव्होकेट ओंकार माने, मुंबई प्रदेश अध्यक्ष श्रीकृष्ण आयचित, सचिव दादासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष भगवान परळीकर, उपाध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव, असोसिएशनचे शिक्षण व विकास संचालक भूषण ओझरडे, संचालक नवनिर्मिती व विकास शिरीष शिवनगीकर, आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास असोसिएशनचे सभासद, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे  आवाहन  उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष यादवराव पावसे, उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, सेक्रेटरी सुनील गीते,
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष किशोर कालडा, जिल्हा सेक्रेटरी संजय लाड, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्यामसुंदर जळके यांनी केले आहे 

=======

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button