संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुका पोलीस स्टेशन जाळून टाकू अशी धमकी देणाऱ्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी दमदाटी पोलिसांना करत पोलीस स्टेशन जाळून टाकू अशी धमकी देणार्या चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस नाईक दत्तात्रय गोविंद दिघे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे राहुल पुंजा वनवे सुदर्शन महादू वनवे, योगेश सुदाम गंभीरे, विठ्ठल भारत वनवे, सर्व राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर व इतर 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी 30 ते 40 जण मोटर सायकल घेऊन आले सरकारी कामात अडथळा आणला व आरोपी आमच्या ताब्यात द्या असे म्हणून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला पोलिसांना शिवीगाळ केली व पोलीस स्टेशन जाळून टाकण्याची धमकी दिली अशी फिर्याद देण्यात आली आहे त्यानुसार गुन्हा30 ते 40 जनां वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे