वासुंदे येथील ४५ लाभार्थ्यांना गाय गोठा प्रकरणाचा लाभ

सुजीत झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे व परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी ग्रामस्थ राहत असून शासकीय योजना शेतकऱ्यांन मिळवून देण्यासाठी सुजीत झावरे पाटील वेळोवेळी पाठपुरावा करत असतात त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत आणि शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून (जिल्हा परिषद) पंचायत समितीच्या माध्यमातून वासुंदे येथील ४५ लाभार्थ्यांना गाय गोठा प्रकरण मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या योजने अंतर्गत ६०,०००/- रु चा धनादेश सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की वासुंदे व परिसरातील शेतकऱ्यांना विविध कृषी शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे या पुढील काळातही त्यासाठी कटिबद्ध आहे गाय गोठे प्रकरणाच्या माध्यमातून 31 लाखापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, गटविकास अधिकारी किशोर माने यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सरपंच सुमनताई सैद, उपसरपंच शंकरराव बर्वे, चेअरमन नारायणराव झावरे, दिलीपराव पाटोळे, भाऊसाहेब सैद, बाळासाहेब झावरे पाटील, बाळासाहेब झावरे, लक्ष्मणराव झावरे, बाळासाहेब शिंदे, रामदास झावरे, विलासराव साठे सर, ठेकेदार इंजि. निखिल दाते, सुदाम भालके, संदेश झावरे, पोपटराव हिंगडे, निवृत्ती बर्वे, भाऊसाहेब झावरे, शिक्षक नेते प्रवीण झावरे खंडू टोपले, नामदेव हिंगडे, गणेश झावरे, विठ्ठल बर्वे, शरद सैद, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
वासुंदे येथील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक शासकीय योजना व कृषी विभागाच्या विशेष योजना यांचा लाभ झाला ही झावरे पाटील शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या हितासाठी नेहमी कार्य करत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त गाय गोठे प्रकरण वासुंदे ग्रामपंचायत साठी मंजूर करण्यामध्ये सुजित पाटलांचे महत्त्वाचे योगदान आहे.
शंकर बर्वे
(आदर्श उपसरपंच, वासुंदे ग्रामपंचायत)