चैतन्य महिला संस्थेचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी – आ.निलेश लंके

बचत गटांच्या व महीला स्वंयरोजगाराच्या माध्यमातुन महिलांचा आर्थिक स्तर उंचावणार ! –
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलेला आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात . महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते त्याप्रमाणे महिलांचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वयम रोजगार उपलब्ध केला जातो
. 1988 मध्ये खेड तालुक्यातील चास कमान या गावातून 14 गटा पासून सुरुवात झालेल्या चैतन्य महिला संस्थेच्या डॉक्टर सुधाताई कोठारी यांनी पीएचडी शिक्षण घेत असताना ऑगस्ट 1993 पासून महिला सक्षमीकरणासाठी हे पहिले पाऊल उचलले . चैतन्य संस्थेचे काम महाराष्ट्र,मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात सुरु आहे . गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी म्हणून महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते . मागील महिन्यापासून चैतन्य संस्था महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने 20000 महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे .
याचे सर्व श्रेय चैतन्य संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त डॉक्टर सुधाताई कोठारे , चैतन्य संस्थेच्या आस्थापना विश्वस्त रेखाताई क्षत्रिय , कार्यकारी संचालिका कल्पना पंत तसेच सारथी संघाच्या सीईओ कौशल्या ताई थिगले उपजीविका समन्वयक आनंता मस्करे हे काम पाहतात . चैतन्य संस्थेची पुढील नियोजन नवीन उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या फळी उभी करणे त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे हे आहे .
रविवार दिनांक 12 जून रोजी पारनेर या ठिकाणी चैतन्य संस्था प्रेरित स्त्रीशक्ती महिला स्वयंसिद्ध व राजमाता जिजाऊ संघ पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांसाठी महिलांनी केलेल्या वस्तूंचे भव्य व्यवसायिक प्रदर्शन पार पडले .या कार्यक्रमाचे उद्घाटन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके तसेच पारनेर शहराचे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर तसेच चैतन्य संस्था स्थापना विश्वस्त सुरेखाताई क्षेत्रीय यांच्या हस्ते करण्यात आले .

माझ्या महिला भगिनींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व महिला सक्षमीकरण मोहिमेस गती मिळण्यासाठी या बचत गटांच्या माध्यमातून महिला भगिनींनी केलेले व्यवसायिक नियोजन हे महीलांचे आर्थिक स्तर उंचावून महिला सक्षमीकरणासाठी पोषक आहे . महिलेचा आर्थिक स्तर उंचावला तर कुटुंब व्यवस्था सक्षम होण्यासाठी त्याची मदत होईल असे यावेळेस आमदार निलेश लंके यांनी सांगितले .
सदर स्टॉल मध्ये महिलांनी वेगवेगळ्या वस्तू या स्टॉलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या .त्यात कुरडई ,पापड , शेवई सह विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ , रेडीमेड कपडे , साफ सफाईचे लिक्विड , नाचणी पापड विविध प्रकारच्या शोच्या वस्तू सर्व खाद्यपदार्थ वडापाव , भजे , ढोसा पाणी पुरी , इडली सांबर , बेसन लाडू या प्रकारच्या खाद्य वस्तू सह पर्स , लोकर पासून बनवलेले वस्तू,आयुर्वेदिक तेल , हॅन्ड वॉश इत्यादी पदार्थ होते .
आमदार निलेश लंके यांनी अनेक खाद्यपदार्थांचा यावेळी आस्वाद घेतला . यावेळी आमदार निलेश लंके यांच्या समवेत नगरसेवक अशोक चेडे,सुभाष शिंदे , विजय भास्कर औटी , डॉक्टर सचिन औटी,भूषण शेलार , योगेश मते, डॉ . कावरे , श्रीकांत चौरे , बाळासाहेब नगरे , नितीन अडसुळ सरपंच बंडू साबळे , भाऊ साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह संस्थेच्या प्रमुख कौशल्या ताई थीगळे प्रजाताई पाईकराव , आनंता मस्करे , पवार सर ज्योती पवार , उज्वला मंदीलकर पारनेर संघ व्यवस्थापक अश्विनी गवळी,सुनिता पाडळे , वैजंयता हरेल , अलका कदम , शैला भांमरे,शोभा ढूस , प्रतिभा अनामिक , जयश्री साधना प्रिया प्रियंका पूजा सारिका छाया सर्व संघ पदाधिकारी व व्यवस्थापक कमीटीचे कार्यकर्ते यांनी सदर प्रदर्शनाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला .