आदिवासी विद्यार्थिनींना छत्री वाटप; लंके प्रतिष्ठानचा उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील म्हसोबाझाप ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपच्या वतीने नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थी वर्गाची शाळेत जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे म्हसोबा झाप येथील गुरेवाडी या ठिकाणी असलेल्या शामजीबाबा विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप आणि म्हसोबाचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणारी पावसाळ्यातील गैरसोय टाळण्यासाठी त्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. हा समाज उपयोगी उपक्रम निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने म्हसोबा झापचे आदर्श सरपंच प्रकाश गाजरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविला.
दरम्यान म्हसोबा झाप ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज राहतो या आदिवासी समाजाच्या हितासाठी निलेश लंके प्रतिष्ठान नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो विद्यार्थ्यांच्या हितासाठी व हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुप नेहमीच कटिबद्ध असतो.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत विविध शालेय साहित्य उपक्रम राबवले जातात. छत्री वाटप करून विद्यार्थ्यांची पावसाळ्यातील होणारी गैरसोय टाळण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानने उचललेले पाऊल हे नक्कीच विद्यार्थी वर्गाच्या हिताचे आहे.
यावेळी म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच अशोक आहेर, गणेश वाळुंज, संतोष हांडे, विलास गाजरे, शांताराम बेलकर, पांडुरंग आहेर, सखाराम शिंदे, बाळकृष्ण गाजरे, योगेश आगळे, तसेच गुरेवाडी येथील शामजीबाबा विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक रुंद कर्मचारी विद्यार्थी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हसोबा झाप ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सतत सुरू असलेला पावसामुळे गरीब कुटुंबातील आदिवासी समाजातील विद्यार्थिनींना छत्रीचे वाटप करून निलेश लंके प्रतिष्ठान व संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. या पुढील काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी व मदतीसाठी आम्ही कटिबद्ध असू
प्रकाश गाजरे
(सरपंच, म्हसोबा झाप)