स्व.गोविंदरावजी आदिक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

अकोले/प्रतिनिधी-
स्व.गोविंदरावजी आदिक साहेबांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले.सनद लागू करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी स्वतःप्रयत्नशिल राहीले.म्हणूनच राजकारणातील सुप्रसिद्ध संत म्हणजेच स्व.गोविंदरावजी आदिक असल्याचे विचार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर यांनी व्यक्त केले.
माजी खासदार स्व.गोविंदरावजी आदिक यांच्या ८५ व्या जयंती निमित्ती महालक्ष्मी विद्यालय पिंपळगाव नाकविंदा येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अॅड. मनकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी राज्यसरचिटणिस विनोद हांडे,कार्यकारणी सदस्य बबनराव आभाळे,प्राचार्य सुनिल धुमाळ यांसह एम.के.आभाळे,व्हि.आर.आभाळे, तुकाराम भोर,महेश खांडरे,सुवर्णा धात्रक,रामनाथ पोखरकर,नवनाथ बगाड,लक्ष्मण बोऱ्हाडे,वाळीबा लगड,रोहिदास लगड,रामभाऊ जाधव तसेच विदयार्थी उपस्थित होते.
अॅड.मनकर यांनी पुढे विचार व्यक्त करताना गर्दीत माणसांच्या माणुस शोधतो मी,याप्रमाणे दुसऱ्याच्या डोळयातील दु:ख ओळखणे महत्त्वाचे असून जिवनात चांगले गुरू मिळायला सुद्धा भाग्य लागते.आई वडीलां इतकच पवित्र स्थान गुरूचे असते. त्यामुळे गुरूंचा आदर व्हावा म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करत गोविंदराव आदिक गेल्याने माझे सर्वस्व हरपल्याची खंत व्यक्त केली.
विनोद हांडे यांनी गरीब,श्रीमंतीची दरी कमी करून त्याग,कर्तृत्व,चांगला विचार घेऊन योग्य दिशा मिळावी म्हणून समाज बदलासाठी जे लोक होऊन गेले त्यापैकी स्व.गोविंदराव आदिक हे एक होते.राजकारण हा एक विचार असून एक तत्वज्ञान आहे.त्यांनी गरीबांच्या भल्याचा विचार केला. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला.कामगारांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला असल्याचे विचार प्रतिपादित केले.
बबनराव आभाळे यांनी इतिहासातील विचार तपासले तरच भविष्यात योग्य दिशेने जाता येईल. त्यासाठी सकारात्मक विचारांची उंची वाढवा.आपले जीवनातील उद्दिष्ट पुर्ण करा.असे विचार व्यक्त करून स्व.गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी प्रास्ताविक करताना दर्जेदार विचार,प्रगल्भ कर्तृत्वाने मोठे झालेल्या व्यक्ती समाजाच्या भल्यासाठी शेवटपर्यंत काम करतात.असे विचार व्यक्त करून स्व.गोविंदराव आदिक यांचा संघर्षमय जिवनक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला.
जेष्ठ शिक्षक रामदास कासार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.
शेवटी सर्व विदयार्थ्यांना लाडू व केळी वाटप करण्यात आले.