प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी पुणे विद्यापीठ गुणवत्ता यादीत!

अकोले/ प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी (ता राहता )येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाने आणि चिकाटीने ही कामगिरी साधली आहे. त्यांच्या परिश्रमाचे आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे
प्रवरा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातचा एम फार्मसीचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये फार्माकोलॉजी विभागात वर्षा तांबे हीने पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय तर प्रियंका कडाले हिने आठवे स्थान मिळवले.
यासोबतच फार्माकोनोसी विभागात माधुरी कवडे हीने विद्यापीठात तृतीय, अपेक्षा संजय फुलसुंदर हिने पाचवे तर समीक्षा घोलप हिने सातवे स्थान मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे
पाटील, शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय
विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. बी. एम. पाटील, प्राचार्य डॉ. संजय भवर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.