….
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जागतिक माहामारीच्या संकटाचा फटका प्रत्येक घटकांला बसलेला असून अनेक प्रकाराची भटकंती करुन जीवन जगणांऱ्या सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. महासत्तेकडे वाटचाल चालू आसलेल्या देशाच्या प्रगतीला खीळ बसत आहे. यात मात्र हातावर उपजीविका करणाऱ्यां माणसाला आनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. यात पारंपारिक कला जोपासून दुसऱ्यांच्या चेहऱ्यांवर हासू फुलवुन आपली तहान भुख भागवणाऱ्यां कलावंताचे जीव जगतानाची धडपड मनाला वेदना देणारी आहे. कधी बालव्यातील लहान लहान मुले देखील पोटासाठी आपला चिमुकला जीव धोक्यात घालून दोरीवरची कसरतीची कला दाखवुन बघ्यांच्या डोळ्यांत आसू आणतात. या व अशा आनेक परंपरा जपलेल्या कलांवतांना डिजिटल युगात उपासमारीला तोंड दयावे लागत आहे. वर्षानुवर्ष कलेला जीवन सर्मित करणारी साध्या माणसांना आजही ग्रामीण भागात लोक सन्मानांची वागणुक देऊन लोक त्यांचे कौतुक करतात. मात्र कोरोना सारख्या महामारीने त्रस्त झालेल्या समाजामध्ये फिरावं कि नाही अशा मनस्थितीत आनेक कलावतांचे कुटुबं विखुरतांना दिसत आहे. गावात आलेला कोणताही कलांवत कला दाखवुन पोटाचा प्रश्न सोडवुन समाधानाने गाव सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद दिसायचा मात्र आता धान्याऐवजी पशुधनासाठी चारा वेचताना पाहुन कलांवतावरहि स्वातंत्र्यांनंतरही हि वेळ यावी यासारखे दुसरे दुर्रभाग्य कोणते अशी म्हणण्यांची वेळ आली आहे. या विषयी विचारल्यावर त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते हसतमुखाने व प्रसन्न चेहऱ्याने स्वीकारत आसल्यांची भावना व्यक्त केली.
अशा कलांवतांचे पुर्नवसन होणे गरजेचे….
आज भटकंती कराणाऱ्यां समाजांचे जीवन स्थिर करावयाचे असेल तर आजच्या राज्यकरत्यांनी या समाजांकडे सामाजिक जाणीवेतुन बघुन त्यांच्या उन्नतीसाठी ठोस असा कार्यक्रम हाती घेऊन त्यांची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.जाहिराती पुरता हा विषय समोर न ठेवता तळागळांपर्यत पाझरांवा अशी अपेक्षा वाटते.
प्रा.किसन चव्हाण
(राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)