संतच माणसाला देवापर्यंत पोहचवतात—ह.भ.प.कारभारी महाराज झरेकर

शनिशिंगणापूरात पारायणाची सांगता,
सोनई–[ विजय खंडागळे°]
मनुष्याला जीवनात आनंद मिळण्यासाठी संतांची संगती पाहिजे,अखंड पारायण सप्ताह ईश्वरीय ज्ञान द्वारा भजन,कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, जागर यातुन भक्त हा देवाचा भुकेला असतो,ते पटवून सांगण्याची प्रबळ इच्छाशक्ती फ़क्त संतामध्ये असते,देवच माणसाचं सांभाळ करतो आणि म्हणूनच भक्तांना देवापर्यंत नेण्यास कार्य संतच करतो असे विचार ह.भ.प.कारभारी महाराज झरेकर यांनी व्यक्त केले.
शनिशिंगणापूर येथे संत महंत उदासी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्यात ह.भ.प.झरेकर बोलत होते. दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.त्यांनी कृष्ण लीला व भगवान शंकर यांची महती विशद केली.
देवस्थानचे व्यवस्थापक कवी संजय बानकर यांनी लिहिल्याल्या शुक्रांतिका,मयूर,मंगेश*याच्या काव्यसग्रहाचे प्रकाशन ह.भ.प.झरेकर महाराज व अध्यक्ष भागवत बानकर ,आजी, माजी विश्वस्तहस्ते प्रकाशन करण्यात आले.दोन वर्षांपूर्वी प्रकाशन करण्याचा संकल्प बानकर यानी केला होता, तो आज पूर्ण झाला,त्याचा मोठा आनंद होत असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. बापूसाहेब देसाई यांनी साहित्यिक जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या भाषणाने एक प्रेरणा व ऊर्जा मिळते असे देसाई म्हटले.या काव्यसग्रहाचे स्वागत करून पारंपरिक पद्धतीने विचाराची शिदोरी नागरिकांना या काव्य संग्रहात नमूद करून जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री गडाख यांच्या प्रेरणेने मी काव्यसंग्रह लिहू शकलो असे बानकर यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सीताराम तुवर यांनी केले. महाप्रसादाने ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली.
पारायण सोहळ्यास देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर,सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे,छबुराव भूतकर,पोपट कुऱ्हाट, सुनीता आढाव,सोपानराव बानकर,रावसाहेब शेटे,मच्छिंद्र शेटे,भाऊसाहेब दरंदले,बाबासाहेब दरदले,मच्छिंद्र तवले आदी उपस्थित होते.