गणोरे सेवा सोसायटी वर सहकार विकास पॅनलचे वर्चस्व !..

गणोरे प्रतिनिधी :- (सुशांत आरोटे)
संपूर्ण अकोले तालुक्याचे मुख्य लक्ष लागलेल्या गणोरे विविध सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली
गणोरे विविध सेवा सहकारी सोसायटीची सत्ता निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यात पुन्हा एकदा सहकार विकास पॅनल ला यश आले आहे. सहकाराचा मार्गदर्शक म्हणून या गावाकडे पाहिले जाते.महाराष्ट्रातील सहकारात ज्यांचे मानाचे स्थान आहे अश्या सहकार भूषण पंढरीनाथ जिजाबा आंबरे (दादा) यांचे हे गाव असून दादांनी आणि त्या काळातील गावकऱ्यांनी मिळून ह्या सेवा सहकारी सोसायटी ची स्थापना केली होती..त्यांच्याच तत्वांवर आणि विचारधारा आजही या ठिकाणी बघायला मिळतात. दादा नंतर या सेवा सहकारी सोसायटी ची नावलौकिक कायम असाच नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढे हा वारसा चालू ठेवतील यात कोणतीही शंका नाही.
गणोरे विविध सेवा सहकारी सोसायटी ची संचालक मंडळ निवडणूक सन 2022 ते 2027 करिताची निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत दोन स्वतंत्र पॅनल सामोरा समोर होते.निवडणुकीत दोन्ही पॅनल ने आपल्या आपल्या परीने प्रचार केला. पत्रक काढून आपले म्हणणे सादर केले, सभासदांनी ह्या सगळ्या प्रचार काळाचा विचार करून पुन्हा एकदा सहकार विकास पॅनल च्या सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांच्या पारड्यात आपली मते टाकत संपूर्ण पॅनल ला एकहाती सत्ता निर्विवाद पने बहाल केली.
यात प्रामुख्याने सर्व साधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी मधून माजी चेअरमन सर्वश्री अशोक गंगाधर आहेर, आहेर अशोक रामभाऊ, आंबरे भाउपाटील जयराम, आंबरे दिपक देवराम, आंबरे सूर्यभान यशवंत, भालेराव सूर्यभान साहेबराव, दातीर मधुकर सावळेराम, दातीर संपत रामचंद्र यांचा विजय झाला. तर महिला राखीव मतदार संघातून सौ.आहेर लता राजेंद्र, सौ. दातीर सुमन सुभाष यांचा विजय झाला तर इतर मागास राखीव प्रवर्ग मधून सर्व श्री खतोडे भगवान शिवराम यांचा विजय झाला तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून श्री नामदेव किसन पवार यांचा विजय झाला असूनअनुसूचित जाती जमाती मधून श्री घोसाळे रवींद्र काचरू यांचा दणदणीत विजय झाला आहे. सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण सहकार विकास पॅनल ने प्रचंड नियोजन करत विजय संपादनासाठी मेहनत घेतली.
विजयी उमेदवारांची मिरवणूक मोठया उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयास पासून होत होत पुढे हनुमान मंदिर येथे सर्वांचे आभार प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी आभार प्रदर्शनात अनेक मान्यवरांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. यात प्रामुख्याने श्री आंबादास दातीर यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली., यात प्रामुख्याने झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी त्यांच्यावर आणि सहकाऱ्यांच्या बाबत झालेल्या आरोपांबद्दल त्यांनी जाहीर मत प्रदर्शित केले.
अंबिका माता मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री रामनाथ दातीर यांनी सांगितले की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा होता परंतु या जनशक्ती ने सहकार विकास मंडळावर प्रचंड विश्वास ठेवून सहकार विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले. तसेच पंचायत समितीचे सदस्य श्री संत नामदेव आंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष शुभम आंबरे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निवृत्ती मुरलीधर आंबरे यांनी केले तर सर्व सभासद सर्व सहकार विकास पॅनलच्या वतीने नेते कार्यकर्ते सर्वांचे तसेच ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या सर्व निवडणूक कर्मचारी,अधिकारी,अकोले पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या सर्वांचे आभार मानण्यात आले.



