इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १३/०७/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २२ शके १९४७
दिनांक :- १३/०७/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २५:०३,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति ०६:५३,
योग :- प्रीति समाप्ति १८:०१,
करण :- वणिज समाप्ति १३:२८,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१ प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:३० ते ०७:०८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१८ ते १०:५७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा १३:२८ नं. २५:०३ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २२ शके १९४७
दिनांक = १३/०७/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल. आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल.

वृषभ
स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल.

मिथुन
घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल.

कर्क
कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका.

सिंह
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील.

कन्या
विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा.

तूळ
चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल.

वृश्चिक
नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल.

धनू
तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल.

मकर
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ
अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.

मीन
आततायीपणे वागून चालणार नाही. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button